पांड्याचं टेन्शन वाढणार, ‘हे’ संघ ठरणार डोक्याला ताप

Mumbai Indians | हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ खेळत आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने अपमानकारक पराभव स्विकारला आहे. चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरोधात पांड्याच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला यंदाच्या आयपीएल 2024 चा पहिला विजय मिळाला आहे. असं असलं तरीही पांड्याचं टेन्शन कमी झालं नाही. इतर संघाना प्ले ऑफमध्ये जाण्याच्या संधी आहे. मात्र मुंबईला अथक परिश्रम करून सामने जिंकावे लागणार आहेत.

एका सामन्यात विजय झाल्यावर नाराज झालेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आहे. मात्र प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मेहनत घ्यावी लागणार आहे. यामुळे आता हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं आहे. दोन संघांचं मुंबई इंडियन्स संघाला मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे इथून पुढील सामने मुंबई इंडियन्स संघाला काळजीपूर्वक आणि जिद्दीने खेळावे लागणार आहेत.

चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ मुंबई इंडियन्स संघासाठी आव्हान असणार आहेत. पांड्याच्या नेतृत्वामध्ये पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव झाल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते पांड्याला ट्रोल करत होते. मात्र चौथा विजय झाल्याने पांड्या आणि मुंबई इंडियन्सला दिलासा मिळाला आहे.

CSK आणि RCB संघासमोर असणार आव्हान

मुंबई इंडियन्स संघाने चौथ्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. दिल्लीला 29 धावांनी पराभूत करत पाणी पाजलं. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आता त्यांचा सामना आरसीबी आणि सीएसकेसोबत होणार आहे. जो आयपीएलचा सर्वात मोठा सामना मानला जातो.

11 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना होणार आहे. तर 14 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज अशी लढत होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. मुंबईला या दोन्ही संघाशी सामना करण्यासाठी मोठी कामगिरी करावी लागणार आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई इंडियन्स हे दोन्ही सामने आपल्या होमग्राऊंडवर वानखेडे स्टेडियमवर खेळणार असल्याने हा प्लस पॉईंट आहे. यामध्ये खरी परिक्षा ही हार्दिक पांड्याची आहे. तो परिस्थिती कशी हाताळेल हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Mumbai Indians Against IPL Team Challenge

महत्त्वाच्या बातम्या

अपघाताबद्दल स्वतः नाना पटोलेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी आईने केलं भयंकर कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत

तुमच्याही चिमुकल्याला रात्री दूध पिण्याची सवय आहे तर वेळीच सावध व्हा!

तरुणांच्या आवडत्या Bajaj Plusar N250 बाईकच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत