Pruthvi Shaw New House | मुंबईत घर असणं हे गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचं स्वप्न असतं. मात्र मुंबईसारख्या मायानगरीमध्ये घर घेणं ही सोपी गोष्ट नसते. लाखो रूपये कमावणाऱ्यांनाही मुंबई सारख्या शहरामध्ये घर घेणं खूप अवघड जातं. अनेकजण आपलं आयुष्य पाणाला लावतात. तेव्हा कुठेतरी त्यांना आपल्या स्वप्नाचं आणि हक्काचं घर घेता येतं. मात्र त्यामागे त्या व्यक्तीची मेहनत असते. भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने (Pruthvi Shaw New House) वांद्रे येथे आपल्या हक्काच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. (Pruthvi Shaw New House)
सध्याच्या आयपीएल 2024 हंगामात दिल्ली कॅपिटलकडून पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw New House) खेळत आहे. त्याने तीन सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये 1 अर्धशतक केलं आहे. ते अर्धशतक मुंबई इंडियन्स संघाविरूद्ध होमग्राऊंड वानखेडेवर केलं आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामात त्याने मुंबईत वांद्रे येथे घर घेतलं आहे.
पृथ्वी शॉच्या घराची किंमत
पृथ्वी शॉने (Pruthvi Shaw New House) याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून त्याने त्याच्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पृथ्वीच्या घराची किंमत ही मिळालेल्या माहितीनुसार 16 कोटी 50 लाख आहे. काही दिवसांपासून पृथ्वी शॉ आपल्या घराच्या इंटेरियरच्या कामात व्यस्त होता.
पृथ्वीने गुढीपाडव्या दिवशी गहप्रवेश केला आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर घराचे अनेक फोटो शेअर केले. त्यातील एका फोटोमध्ये घराचं काम सुरू असलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तयार झालेलं घर दिसत आहे. वांद्रे येथे घर असणं ही फार मोठी गोष्ट असते. त्यामुळे हे घर त्याच्यासाठी स्वप्नपूर्ती असल्याचं तो म्हणाला.
हे स्वप्न पाहण्यापासून ते स्वप्न पूर्ण होईपर्यंतचा प्रवास खूप अवस्मिरणीय होता. माझ्या स्वत:च्या आनंदाचा तुकडा मला सापडल्याने मी खूप खूश आहे. तसेच घराचे इंटेरियर केलेल्यांचं ही त्याने आपल्या पोस्टमध्ये आभार मानले आहेत.
News Title – Pruthvi Shaw New House In Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ नेता कोणाचाच फोन घेईना
‘खोदा पहाड निकला चुहा’, भाजपला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे ट्रोल
शरद पवारांचा बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी भाजपचा मोठा डाव!
पुण्यात प्रचाराला रंगत, मुरलीधर मोहोळ यांना ‘होम मिनिस्टर’ची संगत!