‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chandrakant Patil | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आपल्या उमेदवाराला सोबत घेत मतदारसंघामध्ये जात आहेत. मतदारसंघामध्ये सभा होताना दिसत आहेत. यावेळी विरोधक सत्ताधाऱ्यांवर तर सत्ताधारी विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बैठकीला उपस्थिती दर्शवली. मात्र चालू बैठकीमध्येच एका शेतकऱ्याने माझे 22 लाखांचं नुकसान झालं. तालुक्यातील शेतकऱ्याचं 20 कोटींचं नुकसान झालं असल्याचा दावा केला. संपतराव काळे असं शेतकऱ्याचं नाव आहे.

रणजितसिंह यांना भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यावेळी रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील बैठकीला आले होते. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं भाषण सुरू असताना संपतराव काळे नावाच्या शेतकऱ्याने माझं 22 लाखांचं सरकारने नुकसान केलं असल्याचा दावा केला. केंद्र सरकारने कंपनीला दिलेल्या परवानगीमुळे नुकसान झालं असल्याचं सांगत शेतकऱ्याने भर सभेमध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना जाब विचारला.

शेतकरी संपतराव काळे संतापले

भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. प्रत्येक बुथवर 370 मतं कमळाला पाहिजेत असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. त्यावेळी संपतराव काळे यांनी असं काहीही घडणार नाही, असं म्हटलं. त्यानंतर गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळाला. भाजप आणि कार्यकर्त्यांनी संपत काळे यांना खाली बसवण्यास सांगितलं. तेव्हा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांना बोलू द्या, असं सांगितलं.

गोंधळ वाढल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संपत काळे यांना आपण कोणत्या पक्षाचे? असा सवाल केला. आम्ही सोडलेल्या मतात तुम्ही आहात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. हा घडलेला गोंधळ कॅमेऱ्यानं कैद केला. तुमचं काम झालं असेल तर तुम्ही आता बसा, असं चंद्रकांत पाटील शेतकऱ्याला म्हणाले.

काय आहे नेमकं प्रकरण?

केंद्र सरकारच्या सांगण्यावरून माढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शतावरी वनस्पतीची लागवड केली होती. मंत्री श्रीपाद नाईक यांच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांनी लागवड केली होती. शेतात शतावरी आल्यानंतर हर्बल कंपनीने ती शतावरी नेली. शेतकऱ्यांचं देणं अद्यापही सरकारनं दिलं नसल्याचं संपत काळे म्हणाले. रणजितसिंह निंबाळकर यांना जाऊन भेटलो पण त्यांनी याची दखल घेतली नसल्याचं शेतकरी संपत काळे म्हणाले.

News Title – Chandrakant Patil Against Madha Lok Sabha Farmer Sampatrao Kale Statement

महत्त्वाच्या बातम्या

पांड्याचं टेन्शन वाढणार, ‘हे’ संघ ठरणार डोक्याला ताप

‘आमचा हक्काचा अण्णा…’; सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहोळांचा दणक्यात प्रचार

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ, ‘हा’ नेता कोणाचाच फोन घेईना

‘खोदा पहाड निकला चुहा’, भाजपला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे ट्रोल

शरद पवारांचा बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी भाजपचा मोठा डाव!