सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! ‘या’ विभागात नोकरीची संधी

NPCIL Recruitment 2024 l न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्येभरती प्रक्रिया जाहीर केली आहे. जर तुम्ही अभियांत्रिकी पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. NPCIL ने कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांच्या नियुक्ती GATE स्कोअर 2022/2023/2024 द्वारे केली आहे. पात्र उमेदवार NPCIL च्या अधिकृत वेबसाइट npsilcareers.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

तब्बल ‘एवढ्या’ जागांसाठी भरती सुरु :

NPCIL कार्यकारी प्रशिक्षणार्थी भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरतीद्वारे कार्यकारी प्रशिक्षणार्थीची एकूण 400 पदे भरण्यात येणार आहेत.

मेकॅनिकल: 150 पदे
केमिकल : 73 पदे
इलेक्ट्रिकल : 69 पदे
इलेक्ट्रॉनिक्स: 29 पदे
इन्स्ट्रुमेंटेशन: 19 पदे
सिव्हिल: 60 पदे

NPCIL Recruitment 2024 l पात्रता व आवश्यकता काय आहे? :

BE/B.Tech/B.Sc.(अभियांत्रिकी)/5 वर्षाचे इंटिग्रेटेड M.Tech. AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधून 6 पैकी कोणत्याही 6 अभियांत्रिकी शाखेत किमान 60% गुणांसह असणे आवश्यक आहे. अर्जदारांकडे वैध GATE-2022 किंवा GATE-2023 किंवा GATE-2024 गुण असणे आवश्यक आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार NPCIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

या पदांसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग वैध GATE 2022, GATE 2023 आणि GATE 2024 स्कोअरच्या आधारे 1:12 चे गुणोत्तर लागू करून केली जाणार आहेत. वैद्यकीय फिटनेसच्या अधीन असलेल्या वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल.

सामान्य EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. त्याचवेळी SC, ST, PWD, माजी सैनिक, DODPKIA, महिला अर्जदार आणि NPCIL कर्मचाऱ्यांना अर्ज शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे.

News Title : NPCIL Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या –

आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे काढायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली