सोन्याचा भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | मौल्यवान धातू सोन्याचे भाव कमी होण्याचं काही नाव घेईना. याच्या किमती लगतार वाढतच चालल्या आहेत. सोनं या महिन्यात 72 हजारांवर गेलं आहे. लवकरच याचे दर 75,000 रुपये पार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांची सराफ बाजारात एकदमच गर्दी कमी झाली आहे.

लोकसभा निवडणूक, चीनच्या कुरघोड्या आणि डॉलरच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत रुपयाची झालेली मोठी घसरण या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे. सोन्यासोबतच चांदीदेखील तेजीत आहे. चांदी तर आता थेट 90 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सोन्याची मोठी मुसंडी

एप्रिलच्या पहिल्या 10 दिवसांतच सोन्याने (Gold-Silver Rate Today) जोरदार मुसंडी मारली. या दहा दिवसांत तब्बल 4,400 रुपयांची दरवाढ सोन्यात दिसून आली. या आठवड्यात 8 एप्रिल रोजी 300 रुपयांनी सोनं महागलं. 9 एप्रिल रोजी 110 रुपयांनी भाव वाढला. 10 एप्रिल रोजी सोन्यात 350 रुपयांची दरवाढ झाली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या महिन्यात चांदीचे भावही सुसाट आहेत. या 10 दिवसांत चांदी 8 हजारांनी महागली.

चांदीला लागला ब्रेक

8 एप्रिल रोजी चांदी एक हजारांनी (Gold-Silver Rate Today)महागली. 9 एप्रिलरोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. काल 10 एप्रिल रोजी चांदीत पुन्हा हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये आहे. तर, सोन्याचे कॅरेटनुसारही भाव ठरले आहेत.

गुडरिटर्न्सनुसार, 24 कॅरेट सोने 71,823 रुपये, 23 कॅरेट 71, 535 रुपये, 22 कॅरेट सोने 65,790 रुपये झाले. 18 कॅरेट 53,867 रुपये, 14 कॅरेट सोने 42,017 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर तथा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने याच्या भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today April 11 

महत्वाच्या बातम्या-

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे वापरायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली

‘…म्हणून बोलणी फिसकटली’; भाजप-शिवसेनेकडून मोठा खुलासा