IPL पॉईंट टेबलमध्ये ‘हा’ संघ अव्वल स्थानावर; जाणून घ्या कोणाकडे आहे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Points Table l IPL च्या हंगामात गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स चासामना पार पडला आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 3 गडी राखून पराभव केला आहे. आयपीएल 2024 च्या मोसमातील राजस्थान रॉयल्सचा (RR) हा पहिला पराभव होता. मात्र या पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स (RR) संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 विकेट गमावत 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 199 धावा करत सामना जिंकला आहे.

राजस्थान रॉयल्स संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर :

राजस्थान रॉयल्स (RR) संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे. राजस्थान रॉयल्सने (RR) 5 सामन्यात 4 विजय नोंदवले आहेत. तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सचे 8 गुण आहेत. राजस्थान रॉयल्सचा रन रेट +0.871 आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे सध्या 4 सामन्यांत 3 विजय आणि 1 पराभवासह 6 गुण आहेत. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा रन रेट +1.528 आहे. याशिवाय लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज 6-6 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

IPL 2024 Points Table l ऑरेंज कॅप कोणाकडे आहे? :

सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर विराट कोहली 316 धावांसह अव्वल स्थानावर असून त्याच्याकडे अजूनही ऑरेंज कॅप आहे. राजस्थान रॉयल्सचा (RR) फलंदाज रियान पराग 261 धावांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

तसेच गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल 255 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन 246 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. साई सुदर्शनने आतापर्यंत 226 धावा केल्या आहेत.

या गोलंदाजाकडे आहे पर्पल कॅप :

राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. या मोसमात युझवेंद्र चहलच्या नावावर आतापर्यंत 10 विकेट्स आहेत. युझवेंद्र चहलनंतर चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान 9 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग 8 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा 8 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमद या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. खलील अहमदने आतापर्यंत 7 विकेट घेतल्या आहेत.

News Title : IPL 2024 Points Table

महत्त्वाच्या बातम्या –

सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! ‘या’ विभागात नोकरीची संधी

आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे काढायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता