Maharashtra Weather Update | हवामान विभागाने आज (11 एप्रिल) मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणासह उर्वरित भागात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. या भागाला हायअलर्ट देण्यात आला आहे.
राजस्थानपासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, तो मध्य महाराष्ट्रातूनच पुढं जात असल्यामुळं राज्याच्या काही भागांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. यामुळे विदर्भासह मराठवाड्यातही पावसाची हजेरी पाहायला मिळतेय.
पुढील 24 तासांत हवामान बिघडणार
सध्या विदर्भामधील तापमान 40 अंशांहूनही कमी झालं आहे. त्यामुळे वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या भागांमध्ये गारपीटीसह सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातदेखील अशीच परिस्थिती असून, येथे ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
एकीकडे वादळी वाऱ्यासाह (Maharashtra Weather Update) अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा वाहत आहेत. राज्यात काल (10 एप्रिल) मालेगाव आणि सोलापूर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मालेगाव येथे 41.6 आणि सोलापूर येथे 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
‘या’ भागात अवकाळीचा इशारा
आज 11 एप्रिलरोजी अहमदनगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, देशाच्या बहुतांश राज्यांमध्येही (Maharashtra Weather Update ) सध्या उकाडा वाढत आहे. दिल्लीसह मध्य प्रदेश, राजस्थान आणि दक्षिणेकडे केरळातही उकाडा वाढत असून, येथील गिरीस्थानांवर मात्र तापमानात काहीशी घट कायम आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि उत्तराखंडमध्येही तापमानात बदल होत असले तरीही या भागांमध्ये तुलनेनं उकाडा जाणवत नाहीये.
News Title- Maharashtra Weather Update heavy rain alert
महत्त्वाच्या बातम्या-
आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे काढायचे, जाणून घ्या सर्व काही
राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय
या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता
‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली