HDFC बँकेचा ग्राहकांना अत्यंत महत्त्वाचा इशारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Online fraud | सध्याच्या युगात ऑनलाइन व्यवहार अधिक वाढले. लोकही आता अधिक अॅक्टिव होत आहेत. अधिक अपडेट राहत आहेत. ऑनलाइन बँकिंगही सध्या लोकप्रिय आहे. पण ऑनलाइन बँकिंगच्या वापरामध्ये थोडाही निष्काळजीपणा केला तर तुम्हाला ती चूक खूप महागात पडू शकते.

आजकाल सगळ्याच ऑनलाइन व्यवहारांवर फ्रॉडची नजर असते. हॅकर्स अशा व्यवहारांवर नजरच ठेऊन असतात. त्यामुळे एक चूक आपलं बँक अकाउंट रिकामं करु शकते. तुम्हीही ऑनलाइन बँकिंगचा वापर करत असाल तर तुम्हाला फक्त आपली पर्सनल माहिती गुप्त ठेवायची नाहीये तर आपल्या फोन आणि लॅपटॉपचा वापरही खूप सांभाळून करावा लागेल.

देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक, एचडीएफसी बँकेनेही आपल्या ग्राहकांना सायबर फ्रॉडपासून बचाव करण्याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.यामुळे तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. ग्राहकांना आपल्या डिव्हाइसच्या ब्लूटूथचा वापरही सांभाळून करायला हवा. ब्लूटूथविषयी कोणताही निष्काळजीपणा तुम्हाला ऑनलाइन फ्रॉडला बळी पाडू शकतो, असं एचडीएफसी बँकेनं म्हटलं आहे.

ऑनलाइन फ्रॉडपासून ‘असा’ करा बचाव

ब्लूटूथच्या माध्यमातून आपली सेफ्टी आणि फोनची सिक्योरिटी दोन्हीमध्ये फ्रॉड होऊ शकते.ब्लूटूथचा वापर फोनला ईअरफोन, लॅपटॉप आणि काही इतर गॅजेट्सने कनेक्ट (Online fraud ) करण्यासाठी केला जातो. एचडीएफसी बँकेने म्हटलंय की, वापरानंतर ब्लूटूथ लगेच बंद करायला हवी.

कारण, ब्लूटूथ ऑन असल्यावर हॅकर्ससाठी खूप सोपं होतं. हॅकर्स ब्लूटूथ प्रोटोकॉलमध्ये कमकुवतपणाचा फायदा घेतात. हॅकर्स याच कमतरतांचा फायदा घेऊन तुमच्या फोनच्या सिक्योरिटीमध्ये घुसतात आणि फोन त्यांच्या ताब्यात घेऊन सेंसिटिव्ह डेटा मिळवतात.

वापर झाल्यानंतर आपल्या बँकिंग अ‍ॅप्सला फोर्स क्लोज करायचं नाही, तर सर्वप्रथम अॅपने लॉगआउट करायला हवं. अ‍ॅपला फोर्स क्लोज केल्याने आपण अ‍ॅपने लॉग आउट होत नाही आणि डेटा अव्हेलेबल राहतो. त्यामुळे लॉगआउट करुनच अ‍ॅप बंद करावं.

अनेक अ‍ॅप्ससाठी एकच पासवर्ड न ठेवता बँकिंग अ‍ॅप्ससाठी कोणत्याही परिस्थितीत वेगळा पासवर्ड असायला हवा. यामुळे फ्रॉड होण्याचा धोका कमी राहतो.

आपला फोन कधीही पब्लिक वाय-फायने (Online fraud ) कनेक्ट करू नये. एअरपोर्ट किंवा कॅफे सारख्या सार्वजनिक स्थानाच्या वाय-फायचा वापर करताना बँकिंग अ‍ॅप्स आपल्या फोन किंवा लॅपटॉपवर ओपन करु नये.

फोन खराब झाल्यास कस्टमर केअर किंवा मोबाईल रिपेयरिंग शॉपवर देण्यापूर्वी त्यामधील उपलब्ध बँकिंग अॅप्स हटवायला हवीत. यामुळे बँक अकाउंटमध्ये फ्रॉड होण्याचा धोका कमी होईल. ही काळजी प्रत्येक यूजरने घ्यायलाच हवी. अशाप्रकारे तुम्ही हॅकर्सपासून सुरक्षित राहू शकता.

News Title : HDFC Bank warning for online fraud

महत्त्वाच्या बातम्या –

आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे काढायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली