मोठी बातमी! भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे अत्यंत गंभीर आरोप

Pooja Tadas | लोकसभा निवडणुकीमुळे रोज नवं-नवीन मुद्दे समोर येत आहेत. अशात वर्धा मतदारसंघात सासऱ्याविरुद्ध-सून असा सामना रंगला आहे. भाजपकडून वर्धा लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर, त्यांच्या विरोधात सून पुजा तडस या अपक्ष म्हणून आव्हान देणार आहेत. आज (11 एप्रिल) पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या.

पूजा तडस यांनी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेत सर्वांत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मला वेगवेगळ्या फ्लॅटवर ठेवून उपभोगाची वस्तू समजली, असं म्हणत त्यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

“मुलाला बलात्काराच्या आरोपात वाचवण्यासाठी..”

“स्वतःच्या मुलाला अत्याचाराच्या आरोपामध्ये वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं गेलं. मला एका फ्लॅटवर नेऊन टाकण्यात आलं. त्याठिकाणी मला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. जिथे मी राहते तिथे फक्त मला उपभोगाची वस्तु समजण्यात आलं. त्यातून हे बाळ जन्माला आलं. माझ्या बाळाच्या जन्मानंतर हे बाळ कुणाचं?, याचा डीएनए टेस्ट कर महणून सांगण्यात आलं. 17 महिन्यांचं माझं बाळ आहे. माझ्यावर प्रत्येकवेळी अत्यंत घाणेरडे आरोप करण्यात आले. आज लोक माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत आहेत.”, असा खुलासा पूजा तडस (Pooja Tadas ) यांनी केला आहे.

मला लोखंडी रॉडने मारण्यात आलं. मी याचे पुरावेदेखील सर्वांना देणार आहे. एका स्त्रीवर इतके अत्याचार?, मला बेघर करण्यात आलं. महिलांना आरक्षण द्या, असं तडस म्हणतात. मग, माझ्यासोबत हा अन्याय का?, मला दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं, माझ्यावर खूप अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप पूजा तडस यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदींकडे केली मागणी

‘मोदीजी 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहे. मी पंतप्रधान मोदींना एक विनंत करते की, माझ्या मुलाला न्याय द्या. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्यावा आणि त्यांनी मला न्याय द्यावा.’, अशी मागणीदेखील यावेळी पूजा तडस (Pooja Tadas ) यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता भाजपाकडून यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे सर्वांच्या नजरा असतील.

News Title- Pooja Tadas makes serious allegations against BJP leader Ramdas Tadas 

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी!

IPL पॉईंट टेबलमध्ये ‘हा’ संघ अव्वल स्थानावर; जाणून घ्या कोणाकडे आहे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप?

सोन्याचा भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! ‘या’ विभागात नोकरीची संधी

आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड