“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Mandlik | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज शाहू महाराज यांना उमेदवारी दिली. यावर खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांबाबत अपशब्द वापरले आहेत. चंदगड येथील केसरी येथे सभेला संबोधित करत असताना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नसून त्यांना दत्तक घेण्यात आलं आहे. खरे वारसदार तुम्ही, मी आणि आपण सर्व खरे वारसदार असल्याचं भरसभेत संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी म्हटलं.

संजय मंडलिक यांची जीभ घसरली

कोल्हापूर येथील चंदगड तालुक्यात महायुतीची सभा होती. सभेला संबोधित करत असताना संजय मंडलिक यांची जीभ घसरली आहे. “राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तक आले आहेत”, असं वक्तव्य संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केलं.

“माझे वडिल खऱ्या अर्थानं पुरोगामी होते. मल्लाला हात लावायचा नाही मल्लाला टांगच मरायाची नाही मग कुस्ती कशी होणार?”, असा सवाल त्यांनी बोलत असताना उपस्थित केला.

संजय मंडलिकांची उमेदवारी वाचली

शाहू महाराज यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आल्यानं भाजपमधून संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचा पत्ता कटणार होता. त्यांच्याऐवजी समरजितसिंह यांना संधी देण्यात येणार होती. त्यावेळी शिंदेंनी संजय मंडलिक यांची उमेदवारी कशी बशी वाचवली.

काही दिवसांआधी हसन मुश्रीफ यांनी “देव आला तरीही मंडलिक यांचा पराभव कोणीही करू शकत नसल्याचा”, दावा केला होता. मंडलिक यांची उमेदवारी वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वत:हून लक्ष घातलं आहे.

News Title – Sanjay Mandlik On Shahu Maharaj Big Statement

महत्त्वाच्या बातम्या

“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देणं ही मोठी चूक”, शरद पवारांची कबुली

पत्रकार परिषद घेत शरद पवारांची मोठी घोषणा!

‘या’ सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक; मिळेल दुप्पट परतावा

मोठी बातमी! अभिनेता अक्षय कुमारच्या नावे तरुण मुलीची फसवणूक

अभिनेत्री समंथाने पतीची फसवणूक केली?, घटस्फोटाच्या अडीच वर्षांनी अखेर सत्य समोर