Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. तिने आपल्या खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. 2021 साली ती पती नागा चैतन्यपासून विभक्त झाली.
मध्यंतरीच्या काळात समंथाने कामातून सहा महिन्यांचा ब्रेकसुद्धा घेतला होता. त्यातच तिला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं होतं. मात्र, या कठीण प्रसंगाशी तिने हिमतीने सामना केला. आता ती पुन्हा सक्रिय झाली असून नुकताच तिने तिच्या युट्यूब चॅनलवर आरोग्याशी संबंधित पॉडकास्ट सुरू केला आहे.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू चर्चेत
समंथाच्या (Samantha Ruth Prabhu) पॉडकास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये एका युजरने तिला पती नागा चैतन्यबाबत खोचक प्रश्न विचारला. त्यावर समंथाने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. घटस्फोटाच्या जवळपास तीन वर्षांनंतरही समंथाला याबाबत ट्रोल केलं जातंय. अखेर तिने यावर मौन सोडलं आहे. या यूजरला तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
समंथाने तिच्या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये मॉर्निंग रुटीनविषयी सांगितलं. या एपिसोडच्या कमेंटमध्ये एका युजरने समंथाला तिच्या पूर्व पतीबद्दल प्रश्न विचारला.‘मला सांग, तू तुझ्या निरागस पतीची का फसवणूक केली’, असा सवाल संबंधित युजरने केला. त्यावर समंथानेही त्याला सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सचं तोंड बंद केलं.
ट्रोलर्सला समंथाचं सडेतोड उत्तर
‘माफ करा, पण या सवयी तुमच्या कामी येणार नाहीत. तुम्हाला यापेक्षा आणखी काहीतरी मजबूत उपायांची गरज आहे.तुम्हाला शुभेच्छा.’, असं समंथाने लिहिलं. ती तिच्या पॉडकास्टमध्ये योग साधना आणि प्राणायाम विषयी सांगत होती. त्यामुळे त्याचा संदर्भ देत तिने युजरला हे उत्तर दिलं. तिचं हे उत्तर आता चर्चेत आलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य 2010 पासून एकमेकांना डेट करत होते. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 29 जानेवारी 2017 रोजी दोघांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले.पण, अवघ्या तीन वर्षांच्या संसारानंतर अखेर 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथाने सोशल मीडियावर घटस्फोट घेतल्याचे जाहीर केलं.
News Title- Samantha Ruth Prabhu Gives A Sassy Reply To A Fan
महत्त्वाच्या बातम्या-
आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे काढायचे, जाणून घ्या सर्व काही
राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय
या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता
‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली