सारानंतर कुणाला डेट करतोय कार्तिक आर्यन?, स्वतःच खुलासा करत म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kartik Aaryan | अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या काही वर्षांपूर्वी डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. 2020 मध्ये आलेल्या ‘लव आज कल’ या चित्रपटानंतर या चर्चा अजूनच वाढल्या होत्या. नंतर दोघांनीही ब्रेकअप करत वेगळं व्हायचा निर्णय घेतला.

ब्रेकअपच्या अनेक वर्षांनी दोघांनीही आम्ही रेलेशनशीपमध्ये होतो, अशी कबुली दिली होती. पुढे कार्तिकचे नाव अभिनेत्री अनन्या पांडेसोबत जोडण्यात आलं. नंतर पश्मीना रोशनसोबतही त्याच्या नात्याच्या चर्चा झाल्या. नुकताच कार्तिकने या सर्व चर्चेवर खुलासा केला आहे.

कार्तिक कुणाला डेट करतोय?

‘नो फिल्टर विथ नेहा 6’या शोमध्ये कार्तिकने हजेरी लावली होती. यात त्याने लिंकअप आणि डेटिंगच्या अफवांवर मोठा खुलासा केला. ‘मी सिंगल आहे, पण मी प्रेमाच्या शोधात आहे’, असं यावेळी कार्तिक म्हणाला. ‘चंदू चॅम्पियन’ वर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचं देखील यावेळी तो म्हणाला.

‘जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून माझ्या डोक्यात या चित्रपटाबद्दल कल्पना होती. त्यामुळे मला दुसरं काही विचार करण्याचा वेळच नाही मिळाला. या काळात मी रोबोटिक लाइफस्टाइल जगत होतो. पण, आता माझ्याकडे प्रेमासाठी वेळ आहे.’, असं कार्तिक (Kartik Aaryan) म्हणाला आहे. त्याचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

कार्तिक ‘या’ चित्रपटात दिसणार

कार्तिकच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन देखील पुन्हा एंट्री करणार आहे. या चित्रपटातून ओरिजनल मंजुलिकाचं पुनरागमन होणार आहे. अर्थात विद्या बालन चित्रपटात पुन्हा दिसणार आहे. 2007 मध्ये आलेला भूल भुलैया (Bhool Bhulaiyaa 3) या चित्रपटात विद्याने साकारलेली मंजुलिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. ती पुन्हा एकदा दिसणार म्हटल्यावर चाहते आनंदी उत्सुक आहेत.

यासोबतच चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डीमरीदेखील दिसणार आहे. ती रणबीर कपूर सोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसली होती. यातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. यानंतर तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा झाला. आता ती कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aaryan) रोमान्स करताना दिसणार आहे.

News Title : Kartik Aaryan revelation about love relationship

महत्त्वाच्या बातम्या-

‘मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवून…’; रामदास तडस यांच्या सूनेच्या आरोपांनी खळबळ

“नवरा-बायकोमध्ये पडू नका”, नवनीत राणांनी भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं

अनोळखी नंबरवरून फोन येतायेत? तर या ॲप्सचा वापर करा अन् समजेल कॉलरची माहिती

मोठी बातमी! भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे अत्यंत गंभीर आरोप

HDFC बँकेचा ग्राहकांना अत्यंत महत्त्वाचा इशारा!