“नवरा-बायकोमध्ये पडू नका”, नवनीत राणांनी भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Navneet Rana | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राज्याचं राजकारण वेगवेगळं वळण घेताना दिसत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींमुळे ट्वीस्ट निर्माण होत आहे. अमरावती लोकसभा निवडणूक अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे.

अनेक दिवसांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते मतदारांची तगडी फिल्डिंग लावून आहेत. भाजपने नवनीत ऱाणा (Navneet Rana) यांना लोकसभेचं तिकीट दिलंय. लोकसभा निवडणूक जवळ येत असल्यानं अमरावतीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संताप व्यक्त केलाय.

अमरावतीच्या भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्याबैठकीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता नवनीत राणा रवी राणा यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत आदेश देतील, असं बावनकुळे म्हणाले. त्यावर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी बावनकुळे यांना सुनावलं.

“पती-पत्नीमध्ये पडू नये”

“मी भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम करतेय. मी स्वच्छेने भारतीय जनता पार्टीमध्ये आले. रावी राणा यांना स्वतंत्रपणे पार्टीमध्ये काम करायचंय. त्यामुळे बावनकुळे यांनी पती-पत्नीमध्ये पडू नये,” असं म्हणत नवनीत राणा यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

युवा स्वाभिमानी पक्ष सोडून रवी राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नवनीत राणा यांनी आदेश द्यावा, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यामुळे नवनीत राणा नाराज झाल्या. तर आपण नवरा बायकोच्यामध्ये पडू नये, असं म्हणत राणा यांनी बावनकुळेंना सुनावलं आहे.

मी ज्या पक्षामध्ये कार्यकर्ता आहे. त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहेत. मी माझा स्वच्छेने निर्णय घेतला आहे. नवरा बायकोच्यामध्ये कोणी नाही पडलं तर बरं, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

News Title – Navneet Rana Aggressive On BJP Leader Chandrashekhar Bawankule

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी!

IPL पॉईंट टेबलमध्ये ‘हा’ संघ अव्वल स्थानावर; जाणून घ्या कोणाकडे आहे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप?

सोन्याचा भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! ‘या’ विभागात नोकरीची संधी

आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड