“…त्यातून हे बाळ जन्माला आलं”, पूजा तडस यांचा मोठा खुलासा, राजकारणात खळबळ

Pooja Tadas | लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघमध्ये सासऱ्याविरुद्ध सुनेचा संघर्ष पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजपकडून रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

तर त्यांच्याविरोधात सून पुजा तडस या अपक्ष म्हणून आव्हान देणार आहेत. आज (11 एप्रिल) पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत सासरे रामदास तडस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

पूजा तडस यांनी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेत सर्वांत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मला वेगवेगळ्या फ्लॅटवर ठेवून उपभोगाची वस्तू समजली, असं म्हणत त्यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या.

“मला उपभोगाची वस्तु समजून…”

“आपल्या मुलाला बलात्काराच्या आरोपापासून वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं गेलं. मला एका फ्लॅटवर नेऊन टाकण्यात आलं. त्याठिकाणी मला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. जिथे मी राहते तिथे फक्त मला उपभोगाची वस्तु समजण्यात आलं. त्यातून हे बाळ जन्माला आलं. माझ्या बाळाच्या जन्मानंतर हे बाळ कुणाचं?, या बाळाची डीएनए टेस्ट करा, असं सांगण्यात आलं. 17 महिन्यांचं माझं बाळ आहे, माझ्यावर प्रत्येकवेळी अत्यंत घाणेरडे आरोप करण्यात आले.”, असा खुलासा पूजा तडस (Pooja Tadas) यांनी केला आहे.

मला लोखंडी रॉडने मारण्यात आलं. मी याचे पुरावेदेखील सर्वांना देणार आहे. एका स्त्रीवर इतके अत्याचार?, मला बेघर करण्यात आलं. महिलांना आरक्षण द्या, असं तडस म्हणतात. मग, माझ्यासोबत हा अन्याय का?, मला दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं, माझ्यावर खूप अत्याचार करण्यात आले, असा गंभीर आरोप पूजा तडस यांनी केला आहे.

“मोदींनी मला न्याय द्यावा”

यावेळी पूजा तडस यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. “ज्या लोकप्रतिनिधीची सभा घेण्यासाठी मोदी 20 तारखेला वर्ध्यात येत आहेत. त्यांना माझी विनंती आहे. मोदींनी माझ्या मुलाला न्याय द्यावा. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्यावा आणि त्यांनी मला न्याय द्यावा.’, अशी मागणी पूजा तडस (Pooja Tadas ) यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांची आता राज्यभर चर्चा रंगली आहे.

News Title- Pooja Tadas allegations on Ramdas Tadas

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

‘मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवून…’; रामदास तडस यांच्या सूनेच्या आरोपांनी खळबळ

“नवरा-बायकोमध्ये पडू नका”, नवनीत राणांनी भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं

अनोळखी नंबरवरून फोन येतायेत? तर या ॲप्सचा वापर करा अन् समजेल कॉलरची माहिती

मोठी बातमी! भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे अत्यंत गंभीर आरोप