हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Hardik Pandya | आयपीएल 2024 च्या हंगामात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या कर्णधार पदावरून चर्चेत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागलाय. सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तिन्ही सामन्यांमध्ये पराभव झाल्याने पराभवाचं खापर पांड्यावर फुटलं आहे. अशातच आता पांड्याच्या आणखी एका बातमीमुळे पांड्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) चुलत भावाने पांड्याला अर्थिक व्यवहारात फसवल्या प्रकरणी पांड्या अडचणीत आलाय. पांड्याच्या चुलत भावाला अर्थिक व्यवहारात अफरातफर केल्यानं पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. हार्दिक पांड्या आणि भाऊ कृणाल पांड्या या दोघांचे पैसे त्यांच्या चुलत भावाकडे असल्याची माहिती समोर आलीये.

पांड्याच्या चुलत भावाकडून कोट्यवधींची अफरातफर

पांड्या ब्रदर्सचा आपल्याच चुलत भावावर 4.3 कोटी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. तुषार पांड्या असं पांड्या ब्रदर्सच्या चुलत भावाचं नाव असून त्याला अटक केलं करण्यात आलं आहे. पांड्या ब्रदर्स आणि तुषार पांड्याची कंपनी होती. त्यामध्ये पांड्या ब्रदर्सचे 40 टक्के शेअर्स होते. तर तुषारचे 20 टक्के शेअर्स होते. तुषार पांड्याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीये. (Hardik Pandya)

पांड्याच्या चुलत भावाला अटक

2021 वर्षामध्ये पॉलिमारचा व्यवसाय सुरू करण्यात आला. त्यानंतर वैभवनं स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मात्र त्याने याबाबत काहीही सांगितलं नाही. पैसे देण्यासाठी अफरातफर करायला सुरूवात केली, यामुळे त्याला अटक करण्यात आली.

हार्दिक पांड्या हा यंदाच्या आय़पीएलमध्ये अनेक कारणानं चर्चेत आला. पाच वेळा जेतेपद मिळवलेला संघ पांड्याच्या नेतृत्वात पराभवाची हॅट्रिक पूर्ण करत आहे. यामुळे त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना आहे.

News Title – Hardik Pandya’s Cousin Brother Arrested In Fraud Case

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचा भाव रॉकेटच्या तेजीत; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! ‘या’ विभागात नोकरीची संधी

आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे काढायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय