“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देणं ही मोठी चूक”, शरद पवारांची कबुली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Khadase | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. अनेक नेते हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. एकनाथ खडसे हे देखील लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत. (Eknath Khadase) खडसे भाजपमध्ये मतभेद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले. यानंतर त्यांना आमदारकी मिळाली. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये जाणार आहेत. याबाबत शरद पवार गटाचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय.

“खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देणं ही चूक”

पुण्यातील बैठकीमध्ये शरद पवार यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांना पक्षामध्ये घेऊन चूक केली असल्याचं मान्य केलंय, असा दावा डॉ. सतीश पाटील यांनी केला. एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्या प्रवेशाला आम्ही विरोध केला होता. त्यांना पक्षात घेऊन कोणताच फायदा होणार नाही. मी त्यांना आधीच सांगितलं होतं. आमदारकी देण्याऐवजी त्यांना सामान्य कार्यकर्ता करावं, असं सतीश पाटील म्हणालेत.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला नाही, पक्षाचं वाटोळं झालं”

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात आणि विधानपरिषदेची उमेदवारी देण्यास नकार दिला होता. एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना आपण उत्तर महाराष्ट्राची ताकद वाढवू, असं आश्वासन दिलं होतं. यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला नाही. उलट पक्षाचं वाटोळं झालं, असं पाटील म्हणाले.

त्यांची सून रक्षा खडसे यांच्या विरोधात न लढण्यासाठी त्यांनी आजारपणाचं खोट कारण दिलं आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला. त्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. ही एकनाथ शिंदे यांची खेळी होती. हा प्रकार आता उघड झाला आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले. तिथं त्यांनी कोणाच्या भेटी घेतल्या हा सर्वप्रकार समोर आला आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

एकनाथ खडसे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली असल्याचं म्हणत एकनाथ खडसेंना सुनावलं. एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

News Title – Eknath Khadase Taking In NCP Decision Mistake

महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

‘मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवून…’; रामदास तडस यांच्या सूनेच्या आरोपांनी खळबळ

“नवरा-बायकोमध्ये पडू नका”, नवनीत राणांनी भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं

अनोळखी नंबरवरून फोन येतायेत? तर या ॲप्सचा वापर करा अन् समजेल कॉलरची माहिती

मोठी बातमी! भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे अत्यंत गंभीर आरोप