उन्हाळ्यात ‘ही’ फळे आवर्जून खायला हवीत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Summer Fruits | राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. या एप्रिल महिन्यात तर उष्णतेच्या लाटा वाहत आहेत. तापमानात वाढ झाल्याने आता रात्रीही दमटपणा जाणवत आहे. अचानकच पाऊस तर कधी उष्णता यामुळे आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते.

उन्हात शरीराला थंड ठेवण्यासाठी काही पदार्थ आवर्जून खायला हवेत. या काळात बहुतांश लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. शरीराला लगेच ऊर्जा देतील, असे फळे आवर्जून खायला हवीत. या लेखात अशीच काही फळे सांगितली आहेत, जी उन्हाळ्यात वरदानपेक्षा कमी ठरणार नाहीत.

उन्हाळ्यात ‘ही’ फळे आवर्जून खायला हवीत

आंबा : उन्हाळ्यात आवर्जून खाल्लं जाणारं (Summer Fruits) फळ म्हणजे आंबा. आंबा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतो आणि उन्हाळ्यात अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. आंबा आणि आमरस याशिवाय उन्हाळ्याची मजा काही पुर्ण होत नाही. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी वरदान आहे. यामुळे डोळ्यांचा प्रकाश कायम राहतो.

आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा चमकदार होतो आणि व्हिटॅमिन सी संसर्गापासूनही संरक्षण होते. आंब्यामध्ये अनेक एंजाइम असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात. त्यामुळे अन्न लवकर पचते. आंबा खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.

पेरू : या दिवसांत पेरू जास्त मिळत नाही. पण, पेरूमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर आहे आणि ते खाण्याचे अनेक फायदे आहेत. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, ज्यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो. यासोबतच पेरू खाल्ल्याने तणाव कमी होतो.

खरबूज : खरबूज हे फळ चवीला सौम्य गोड लागते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे विपुल प्रमाण आढळून येते. या दोन्ही घटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
यामध्ये आढळून येणारे बीटा कॅरोटीन हे आपले डोळे निरोगी ठेवण्याचे काम करते.

कलिंगड : कलिंगडमध्ये पाण्याचे (Summer Fruits) प्रमाण भरपूर असते. कलिंगडामध्ये 90% पाण्याचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, या फळाचे सेवन केल्यावर आपल्या शरीराला पाण्याचा पुरवठा होतो आणि ऊर्जा मिळते.याशिवाय यात भपुर फायबर, पोटॅशिअम, लोह आणि इतर अनेक घटक असतात.

स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.यामुळे शरीरातील जीवनसत्त्वे आणि फायबरची कमतरता पूर्ण करते.

संत्री : संत्र्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आढळते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. वजन कमी करायचे असेल तर संत्री खूप फायदेशीर ठरते. याशिवाय संत्र्यात अमिनो अॅसिड, फायबर, कॅल्शियम, आयोडीन, फॉस्फरस, सोडियम, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि ब यांसारखे उत्तम घटक आढळतात.

द्राक्षे :  द्राक्षे ही उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारी फळे आहेत. ते अँटिऑक्सिडंट्समध्ये उच्च आहेत आणि पोटॅशियमचे समृद्ध स्रोत आहेत. तुमचे कोलेस्ट्रॉल किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास तुमच्या आहारात द्राक्षांचा समावेश करा. द्राक्षे तुमचे हृदय निरोगी ठेवतील.

अननस : अननस हे उष्णकटिबंधीय फळांपैकी एक आहे. अननस चयापचय वाढवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. ते उच्च रक्तदाब नियंत्रित करतात आणि कॅलरी बर्न करण्यास देखील मदत करते.

News Title- Summer Fruits

महत्त्वाच्या बातम्या –

आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे काढायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली