प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP West Bengal | लोकसभा निवडणुकीचं वारं सगळीकडे वाहत आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान तोंडावर आलंय. याकडे राज्यासह देशाचंही लक्ष लागलंय. उमेदवार मतदारसंघामध्ये जात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये (BJP West Bengal) भलतंच घडलं आहे. भाजप उमेदवाराने प्रचाराला गेल्यानंतर एका महिलेचा मुका घेतला आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवणडणुकीचं मतदान तोंडावर आलंय. राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अनेक ट्वीस्ट घडताना दिसत आहे. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं ते आता पश्चिम बंगालमध्ये (BJP West Bengal) झालं आहे. भाजप उमेदवारानं प्रचार करायला गेल्यानंतर महिलेचा मुका घेतला. यामुळे घडलेल्या घटनेवर हसावं की रडावं हे समजेना. भाजप उमेदवारानं केलेल्या कृत्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.

पश्चिम बंगालमधील (BJP West Bengal) उत्तर माल्डा लोकसभा मतदारसंघातील खगेन मूर्मू यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. सोमवारी श्रीहीपूर येथे गावात प्रचाराला गेले असताना त्या उमेदवारानं महिलेचा मुका घेतला. तेव्हा मतदारांना भेट देण्यासाठी गेले असता त्यांचं फेसबुक लाईव्ह सुरू होतं. त्यामध्ये हा प्रकार रेकॉर्ड झाला. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. यावेळी नेटकऱ्यांनी आणि मतदारांनी भाजपवर सडकून टीका केली. (BJP West Bengal)

तृणमूल काँग्रेसनं घेतला समाचार

भाजपचे खासदार आणि उत्तर माल्डाचे उमेदवार खगेन मूर्मू यांनी प्रचारावेळी एका महिलेचा जबरदस्तीने मुका घेतला आहे. महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषण करणाऱ्यांपासून बंगाली महिलेंवर अश्लील गाणी बनवणाऱ्यांपर्यंत, भाजपच्या विरोधात वागणाऱ्या नेत्यांची संख्या अधिक नाही. अशा प्रकारे महिलांचा सन्मान करण्यासाठी मोदींच्या परिवाराचा वाटा आहे. पुन्हा हे जर सत्तेत आले तर काय करतील पाहा, अशी टीका तृणमूलने केलीये.

खगेन मूर्मू यांची प्रतिक्रिया

खगेन मूर्मू यांनी प्रतिक्रिया दिलीये. तृणमूल काँग्रेसने खगेन यांनी केलेल्या कृत्याचा सामचार घेतला आहे. त्यावर खगेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, त्यांनी आरोप करत विरोधकांनी हा फोटो एडीट करून व्हायरल केला आहे, असं खगेन म्हणालेत.

News Title – BJP West Bengal Candidate Kiss To Young Women, Video Viral

महत्त्वाच्या बातम्या

“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देणं ही मोठी चूक”, शरद पवारांची कबुली

पत्रकार परिषद घेत शरद पवारांची मोठी घोषणा!

‘या’ सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक; मिळेल दुप्पट परतावा

मोठी बातमी! अभिनेता अक्षय कुमारच्या नावे तरुण मुलीची फसवणूक

अभिनेत्री समंथाने पतीची फसवणूक केली?, घटस्फोटाच्या अडीच वर्षांनी अखेर सत्य समोर