‘या’ सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक; मिळेल दुप्पट परतावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Government Scheme | पैशांची बचत करायची असेल तर सरकारी योजनांचा (Government Scheme) अधिक फायदा होतो. विविध योजनांच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करत पैशांची बचत करता येते. यासाठी सरकारी योजनांमध्ये (Government Scheme) पैसे गुंतवणूक केल्यास भविष्यामध्ये त्याचा चांगला फायदा होतो.

गुंतवणूक करण्यासाठी सरकारी योजनांचा (Government Scheme) वापर करणं फार गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी योजनांमध्ये (Government Scheme) गुंतवणूक केल्यास पैशांचीही बचत होते. तर दुसरीकडे परतावा चांगला मिळतो. म्हणून सामान्य माणूस सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत.

किसान विकास पत्र

किसान विकास पत्र ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये 7.5 टक्के व्याजदर आहे. या योजनेमध्ये 1000 रूपयांपासून तुम्ही पैसे गुंतवू शकता. यासाठी 115 महिन्यांचा कालावधी आहे. म्हणजेच 9 वर्षे 7 महिने कालावधी आहे. जर गुंतवणूकदराने 5 लाख रूपये गुंतवणूक केले तर गुंतवणूकीचा कालावधी संपल्यानंतर 5 लाखांचे 10 लाख रूपये मिळतील. थोडक्यात मिळकतीच्या कालावधीत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होईल.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

सार्वजनिक निर्वाह निधी म्हणजे पीएफ होय. गुंतवणुकीसाठी पीएफ हा चांगला मार्ग आहे. यावर गुंतवणुकदरास 7.1 टक्के व्याजदर मिळते. पैसे दुप्पट करण्यासाठी 10 वर्षांहून कमी कालावधी लागतो. कमी गुंतवणूक करून चांगला फायदाही मिळवता येईल.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना महत्त्वाची योजना आहे. मुलींच्या नावे या योजनेत गुंतवणूक करता येईल. या योजनेच्या गुंतवणुकीवर 8.2 टक्के व्याज आहे. तर 10 वर्षांच्या खालील मुलींना या योजनेत बचत करता येईल. या योजनेत तुम्ही कमीत कमी 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

 News Title – Government Scheme Investment Plane

महत्त्वाच्या बातम्या

“नवरा-बायकोमध्ये पडू नका”, नवनीत राणांनी भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं

अनोळखी नंबरवरून फोन येतायेत? तर या ॲप्सचा वापर करा अन् समजेल कॉलरची माहिती

मोठी बातमी! भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे अत्यंत गंभीर आरोप

HDFC बँकेचा ग्राहकांना अत्यंत महत्त्वाचा इशारा!

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी!