‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Murlidhar Mohol | लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात उमेदवारांची जय्यत तयारी सुरु आहे. लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराची चांगलीच चुरस लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी मोठ्या दणक्यात प्रचार सुरु केला आहे. दरम्यान तिघांमधून कोणी बाजी मारणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरलीधर मोहोळ हेच निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मोहोळांसाठी मुख्यमंत्री मैदानात-

लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं नाही तोवर इकडे उमेदवारांनी प्रचाराची तयारी केली. पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे घरोघरी जाऊन सर्वसामान्यांच्या भेटी घेत आहेत.

एवढंच नाही तर मोहोळ यांनी सोशल मीडियावर देखील प्रचाराचा धडाका लावला आहे. मोहोळ यांच्या प्रचारासाठी तरुण पीढी तर मैदानात उतरलीच आहे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील मोहोळ यांच्या प्रचारात सामील झाले.

मुरली अण्णाच निवडूण येणार- एकनाथ शिंदे

आज (11 एप्रिल) रोजी पुण्यात महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुण्यातील कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा प्रचार दणक्यात सुरु आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी हजेरी लावताना दिसत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे बोलत असताना म्हणाले की, पुण्यात कोणताही भाऊ, तात्या नाही तर मुरली अण्णाच निवडून येणार.

एवढंच नाही तर राजकारणात कुठला डाव कधी टाकायचा हे मुरलीधर अण्णांना माहिती आहे. त्यामुळे स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे त्यांच्यापुढं टिकणार नाहीत, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

बावनकुळे मोहोळांच्या प्रचारात सक्रिय-

त्यातच चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मोहोळांच्या प्रचारात सक्रिय सहभाग दाखवला आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री मोहोळांचा प्रचार करताना दिसणार आहेत. सोशल मीडियावर वेळोवेळी अपडेट्स देत आणि रिल्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत मोहोळ पोहोचत असल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर मोहोळ भेटीगाठींवर देखील भर देत प्रचार करताना दिसत आहे.

News Title : murlidhar mohol to win loksabha election

महत्त्वाच्या बातम्या-

“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला

प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!

उन्हाळ्यात ‘ही’ फळे आवर्जून खायला हवीत!

“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देणं ही मोठी चूक”, शरद पवारांची कबुली

पत्रकार परिषद घेत शरद पवारांची मोठी घोषणा!