Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. अनेक उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करताना सभा घेताना दिसत आहेत. कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघामध्ये भाजपकडून नाराय़ण राणे यांना तिकीट देण्याच्या चर्चा आहेत. याचपार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप नेते नितेश राणे मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत. मला हवा तसा लिड भेटला नाहीतर तुम्हाला पाहिजे असलेला निधी देखील देणार नाही, असा सज्जड दम नितेश राणे यांनी सरपंचांना दिलाय.
धमकी होती की इशारा?
नितेश ऱाणे यांनी केलेल्या वक्तव्याची केवळ मतदारसंघातच नाहीतर आता राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांनी ही धमकी होती की इशारा?, असा सवाल उपस्थित केलाय. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून ते पुन्हा सज्जड दम देत असल्याचं म्हटलं जातंय. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)
सरपंचांच्या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुका राबवल्या होत्या त्याच यंत्रणा आता देखील राबवा. नारायण राणे यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या, असा इशारा नितेश राणे यांनी कणकवली देवगड मतदारसंघातील सरपंचांना दिला आहे. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)
महायुतीतून अद्यापही नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. मात्र नारायण राणे यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नितेश राणे यांच्या भाषणावरून नारायण राणेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
“निधी मिळाला नाही म्हणून तक्रार करायची गरज नाही”
कणकवली देवगड मतदारसंघामध्ये नितेश राणे यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीला अनेक स्थानिक भाजप नेते उपस्थित होते. यावेळी बोलत असताना नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दम दिलाय. “जेवढं मतदान मिळालं तेवढं मतदान मला हवंय. त्याहून एकही टक्के कमी मतदान मला चालणार नाही. 4 जूनला सर्वांचा हिशोब घेऊन बसणार आहे. त्यानंतर आमदाराकडं यायचंय निधी मागायला. 4 जूनला हवं तसं लीड मिळालं नाहीतर निधी मिळाला नाही म्हणून तक्रार करायची गरज नाही,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
News Title – Ratnagiri Sindhudurg Lok Sabha In Nitesh Rane Statement
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत केलं भयंकर कृत्य, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!
जळगावात भाजप उमेदवार बदलणार?, उमेदवारीसाठी ‘या’ नेत्यानं गाठली दिल्ली
दुसऱ्यांदा लग्न करुनही मन भरे ना; अभिनेता अरबाज खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर?
‘केजीएफ’ स्टार यशने तब्बल इतक्या कोटींची ऑफर धुडकावली?,’या’ भूमिकेसाठी दिला नकार
जसप्रीत बुमराहचा जलवा, केला ‘हा’ मोठा पराक्रम