जसप्रीत बुमराहचा जलवा, केला ‘हा’ मोठा पराक्रम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians | आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची पहिल्या तिन्ही सामन्यामध्ये खराब कमगिरी पाहायला मिळाली होती. मात्र चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने चांगली कामगिरी केली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने रॉयल चॅलेंजर्स विरूद्ध नाणेफेकी जिंकत गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. पांड्याच्या निर्णयाला जसप्रीत बुमराहानं सार्थ अशी गोलंदाजी केली.

जसप्रीत बुमराहने आरसीबीचा सलामीवीर फलंदाज विराट कोहलीला अवघ्या तीन धावांवर बाद केलंय. बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर निम्मा संघ तंबूत परतला. बुमराहच्या तिखट गोलंदाजीसमोर आरसीबीनं 20 षटकांमध्ये 196 धावा करत 197 धावांचं आव्हान ठेवलं. (Mumbai Indians)

बुमराहने 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला

विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, महिपाल लोमरोर तसेच इतर आणखी दोन फलंदाज सौरव चव्हाण आणि विजयकुमार विशकला बुमराहनं आपल्या जाळ्यात अडकवलं. बुमराहनं आपल्या गोलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यानं आरसीबीचा अर्धा संघ तंबूत पाठवला. 4 षटकं फेकत त्यानं केवळ 21 धावा देत अर्धा संघ बाद केलाय. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस या दोन विकेट्स फार महत्त्वाच्या होत्या.

पर्पल कॅप बुमराहकडे

मुंबई इंडियन्स आणि आरसीबीच्या सामन्यात बुमराहनं तब्बल 5 फलंदाज बाद केलेत. जसप्रीत बुमराहने पर्पर कॅपचा दावेदार असलेला फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलला मागे सारलंय. चहलच्या 10 विकेट्स आहेत आणि बुमराहच्या देखील 10 विकेट्स आहेत. मात्र बुमराहनं कमी धावा दिल्यानं चहलची जागा बुमराहनं घेतली असून बुमराह आता पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) सुरूवातीला धावांचा पाठलाग करताना चांगला खेळ सुरू ठेवला. सलामीला आलेला डावखुरा फलंदाज इशान किशन आणि रोहित शर्माने शतकी खेळी खेळत चांगली कामगिरी केली. तर इशान किशनने वैयक्तिक 69 धावा करत संघाला भक्कम स्थितीत आणलं. दुसरीकडे रोहितने देखील इशान किशनला चांगली साथ दिली. त्यानंतर इशान किशनला आरसीबीचा गोलंदाज आकाश दीपने झेलबाद केलं. तसेच सुर्यकुमार यादवनं मागील सामन्यात फार चांगली कामगिरी केली नाही. पण या सामन्यामध्ये त्यानं 17 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं. तर हार्दिक पांड्याने नाबाद खेळी करत 6 चेंडूत 21 धावा करत विजयी षटकार खेचला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.

News Title – Mumbai Indians Bowler Jasprit Bumrah Top In Purple Cap List

महत्त्वाच्या बातम्या

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?

“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला

प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!

उन्हाळ्यात ‘ही’ फळे आवर्जून खायला हवीत!