सर्वसामान्यांना दणका!, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच रिचार्ज महागणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mobile Recharge Hike | लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे देशासह राज्यातील वातावरण तापलं आहे. लोकसभेचा निकाल 4 जूनरोजी लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

लोकसभेच्या निवडणुकांनंतर टेलिकॉम कंपन्या रिचार्जमध्ये 15ते 17 टक्क्यांनी वाढ करू शकतात, असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच दणका बसण्याची शक्यता आहे. महागाईचा जोर कायम असताना आता फोनचे रीचार्जही महाग होणार असल्याने जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील कोट्यवधी लोकांच्या खिशाला आता झळ बसणार आहे.

देशात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशात एक रिपोर्ट समोर आल्याने सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, सार्वत्रिक निवडणुकांनंतर दूरसंचार उद्योगांमध्ये 15-17 टक्के शुल्काची वाढ होण्याचा अंदाज आहे. अँटीक स्टॉक ब्रोकिंगच्या या रिपोर्टनुसार, दूरसंचार क्षेत्रात शुल्क वृद्धी खूप दिवसांपासून पेंडिंग आहे आणि असंही मानलं जातंय की, निवडणुकांनंतर यामध्ये वाढ ही ठरलेली आहे.

मोबाईल रिचार्ज महागणार!

गेल्या वेळी डिसेंबर 2021 मध्ये याच्या शुल्कात (Mobile Recharge Hike) जवळपास 20 टक्क्यांची वाढ झाली होती. आता जवळपास 3 वर्षांनंतर त्यात वाढ केली जाईल. 17 टक्के वाढ म्हणजे, जर तुम्ही सध्याच्या घडीला 300 रुपयांचे रिचार्ज करत असाल तर वाढीनंतर ते 351 रुपये होईल.

देशात भारती एअरटेल ही दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून याबाबत या अहवालात नमूद करण्यात आलंय की, भारती एअरटेलचा ARPU आर्थिक वर्ष 27 च्या अखेरीस 286 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तो सध्या 208 रुपये आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ‘आम्हाला भारती एअरटेलचा ग्राहकवर्ग दरवर्षी सुमारे दोन टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे, तर उद्योगात दरवर्षी एक टक्क्यांची वाढ होईल.’

कुणाला फायदा होईल?

या रिपोर्टनुसार वोडाफोन आयडियाची बाजार (Mobile Recharge Hike) भागिदारी सप्टेंबर, 2018 च्या 37.2 टक्क्यांनी कमी होऊन डिसेंबर 2023 मध्ये जवळपास अर्धी म्हणजेच 19.3 टक्के राहिली आहे. तर, दुसरीकडे भारतीची बाजार भागिदारी या दरम्यान 29.4 टक्क्यांनी वाढून 33 टक्के झाली आहे. जियोची बाजार हिस्सेदारी या दरम्यान 21.6 टक्क्यांनी वाढून 39.7 टक्के झाली आहे. त्यामुळे जियोला याचा लाभ होईल.

News Title : Mobile Recharge Hike after Lok Sabha Elections

महत्त्वाच्या बातम्या-

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडणार; कोण बाजी मारणार?

सिनेसृष्टीत शोककळा! साखरपुड्याच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल