आधार कार्डमध्ये जन्मतारीख चुकलीये?,’असं’ करा दुरुस्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डमध्ये तुमची माहिती चुकीची असल्यास ती दुरुस्त करण्याचा सल्ला दिला जातो. कारण, आधार कार्ड जवळपास सर्वच ठिकाणी महत्वपूर्ण मानले जाते. आधार कार्डमध्ये घराचा पत्ता बदलला की तो अपडेट होतो, पण चुकीची जन्मतारीख दुरुस्त करता येते का?, हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर ‘हो’ असं आहे.

आधार कार्डमधील जन्मतारीख वारंवार बदलली जाऊ शकत नाही. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या ओळखीशी निगडित एक आवश्यक दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज बँकिंगपासून अनेक सरकारी कामांमध्ये वापरला जातो. पाहायला गेल्यास, UIDAI च्या नियमांनुसार आधार कार्डमध्ये जन्मतारीख एकदाच अपडेट करता येते.

DOB अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जन्मतारीख अपडेट करण्यासाठी (Aadhaar Card) तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटची आवश्यकता असेल. जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही पॅनकार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक, विद्यापीठाने जारी केलेले प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र वापरू शकता.

Aadhaar Card मध्ये ‘असं’ अपडेट करा DOB

सर्वप्रथम आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जाणे.
येथून दुरुस्ती फॉर्म घेऊन तो भरून घ्या.
आता जन्मतारखेसह सर्व तपशील फॉर्ममध्ये भरून घ्या.
आता हा फॉर्म नीट वाचून भरा आणि सबमिट करा, त्यानंतर बायोमेट्रिक तपशील घेतला जाईल.
फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेल्या माहितीची पुष्टी केली जाईल आणि त्यानंतर प्रक्रिया पुढे जाईल.

तपशील अपडेट करण्यासाठी 50 रुपये किंवा 100 रुपये शुल्क देखील जमा करावे लागेल.
यानंतर तुम्ही URN स्लिप घेऊ शकता.
या स्लिपद्वारे तुम्ही अपडेट स्टेटस ट्रॅक करू शकता.
आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून वापरू शकता.
तुम्ही भारत सरकारचे अधिकृत आधार कार्ड ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपवर तुम्हाला आधार दुरुस्ती फॉर्म मिळेल तुम्ही या फॉर्मचे PDF स्वरूप तपासू शकता.

News Title- Aadhaar Card DOB update process

महत्त्वाच्या बातम्या –

सिनेसृष्टीत शोककळा! साखरपुड्याच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास