ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hyundai Grand i10 Nios l ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने Grand i10 Nios लाइन-अप मध्ये एक नवीन प्रकार लाँच केला आहे. कॉर्पोरेट व्हेरिएंट नावाचा हा नवीन प्रकार, Magna आणि Sportz प्रकारांमध्ये लाँच केला आहे. या नवीन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.93 लाख रुपये असणार आहे.

Hyundai Grand i10 Nios फीचर्स काय आहेत? :

नवीन Hyundai Grand i10 Nios कॉर्पोरेट व्हेरियंटच्या बाहेरील भागामध्ये 15-इंच ड्युअल-टोन स्टाइल स्टील व्हील, ब्लॅक-आउट ग्रिल, बॉडी-रंगीत डोअर हँडल, LED DRLs, LED टेललाइट्स आणि टेलगेटवर ‘कॉर्पोरेट’ बॅज दिले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ही आवृत्ती नवीन Amazon ग्रे रंगात देखील उपलब्ध असणार आहे.

2024 Grand i10 Nios कॉर्पोरेट व्हेरियंटच्या आतील भागात ड्युअल-टोन इंटीरियर थीम, उंची-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, फूटवेल लाइटिंग, 6.75-इंच टचस्क्रीन सिस्टम आणि मागील एसी व्हेंट्स यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय यामध्ये इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ORVM, ड्रायव्हरच्या बाजूसाठी ऑटो डाउन पॉवर विंडो फंक्शन, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, चार स्पीकर, मागील पॉवर आउटलेट आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळत आहेत.

Hyundai Grand i10 Nios l किंमत किती असणार? :

कंपनीने सुरक्षिततेसाठी या प्रकारात सहा एअरबॅग्ज, TPMS, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, सीट-बेल्ट रिमाइंडर सिस्टम, सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट आणि इम्पॅक्ट-सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक फंक्शन मिळत आहे. Grand i10 Nios कॉर्पोरेट व्हेरियंटमध्ये 1.2-लीटर, NA पेट्रोल इंजिन, 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा AMT युनिटसह जोडलेले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे इंजिन 82bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. तसेच Grand i10 Nios कॉर्पोरेट 1.2 MT व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.93 लाख रुपये आणि Grand i10 Nios कॉर्पोरेट 1.2 AMT व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.58 लाख रुपये असणार आहे.

News Title : Hyundai Grand i10 Nios Launch

महत्त्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?

“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला

प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!