RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू

MI Vs RCB Highlights l IPL 2024 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एकतर्फी 7 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 196 धावा केल्या तर प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने हे मोठे लक्ष्य अगदी सहजपणे गाठले आहे. त्यामुळे हा सामना फारच रोमांचक झाला आहे.

MI Vs RCB Highlights l ईशान किशनची जबरदस्त खेळी :

मुंबईच्या संघातील स्टार खेळाडू इशान किशनने सर्वाधिक 69 धावा केल्या आहेत. ईशान किशनने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 7 चौकार लगावले आहेत. तसेच सूर्यकुमार यादवने देखील 19 चेंडूत 52 धावांची खेळी केली आहे. तर रोहित शर्माने 38 धावांचे योगदान दिले आहे. यासोबतच मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाबाद 21 आणि तिलक वर्माने 6 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 6 पैकी 5 सामने गमावले आहेत. बेंगळुरूने सलग चार सामने गमावले आहेत. आरसीबी संघ आता गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे. मुंबई संघ आता 2 सामने जिंकून 7 व्या स्थानावर पोहोचला आहे.

MI Vs RCB Highlights l दिनेश कार्तिक आणि रजत पाटीदार यांची झंझावाती खेळी ठरली व्यर्थ :

दिनेश कार्तिक आणि रजत पाटीदार यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 196 धावा केल्या.मात्र त्यांची खेळी व्यर्थ ठरली. पॉवरप्लेमध्येच मुंबई इंडियन्सने 72 धावा केल्या आणि इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे.

ईशान किशनने आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजावर निशाणा साधला आहे. या खेळाडूने 34 चेंडूत 69 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 24 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या जोरावर 38 धावा केल्या आहेत.

News Title : MI Vs RCB Highlights

महत्त्वाच्या बातम्या-

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?

“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला