सिनेसृष्टीत शोककळा! साखरपुड्याच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

Actor Suraj Meher Death l सिनेसृष्टीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगढ येथील प्रसिद्ध खलनायक सूरज मेहर याचा 10 एप्रिल रोजी रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या या निधनामुळे छत्तीसगढी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. बिलाईगडमधील सरसिवा परिसरात त्यांच्या स्कॉर्पिओ पिकअप वाहनाची धडक झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

साखरपुड्याच्या दिवशी सुरजचे मेहरचे निधन :

धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी 40 वर्षीय सूरज मेहर यांचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्याचा ओडिशातील भथली येथे साखरपुडा होणार होता. या सर्व कार्यक्रमांमुळे सारिया बिलाईगढ गावातील रहिवासी सूरज मेहर हा बिलासपूर येथे आखरी फैसला या चित्रपटाचे शूटिंग आटोपून 9-10 एप्रिल रोजी रात्री उशिरा परतत होता त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 एप्रिलच्या पहाटे झालेल्या अपघातानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. ही धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओच्या पुढे बसलेल्या सूरज मेहरचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सरसिवा पोलिसांनी घटनास्थळी ढव घेऊन स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले.

Actor Suraj Meher Death l सुरजच्या निधनाने आई वडिलांसह सिनेसृष्टीला मोठा धक्का :

या अपघातात त्याचा दुसरा मित्र आर्य वर्मा आणि स्कॉर्पिओ स्वार चालक भूपेश पटले हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. मात्र दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सूरज मेहर हा ‘तोर मया के चिन्हा’ या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता.

सुरजने अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच सुरज हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र त्याच्या या जाण्याने आई वडिलांसह सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आता सूरज मेहरच्या निधनानंतर त्याच्या ‘आखिरी फैसला’ चित्रपटाचं शूटिंग नेमकं कसं होणार? कोणता अभिनेता सूरजची जागा घेणार हे आता पाहावे लागणार आहे.

News Title : Actor Suraj Meher Deat

महत्त्वाच्या बातम्या-

RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?