Kgf Star Yash | दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाचं शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. प्रभू श्रीराम, माता सीता, हनुमान आणि रावण यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. अभिनेता रणबीर कपूर यात रामाची भूमिका साकारणार आहे.
रणबीरने या भूमिकेसाठी खास ट्रेनिंगदेखील सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ट्रेनिंग दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर, चित्रपटात रावणची भूमिका ‘केजीएफ’ स्टार यश साकारणार, अशी जोरदार चर्चा होती. पण, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
यश रावणाची भूमिका करणार नाही?
यशने रावणाची भूमिका करण्यास नकार दिल्याचं कळतंय. या भूमिकेसाठी यशला तगडं मानधन देण्यात येणार होतं. मात्र या मानधनाला न भुलता त्याने भूमिकेला नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार रावणाच्या भूमिकेसाठी यशला तब्बल 80 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.
रावणाची भूमिका नाकारूनही यश (Kgf Star Yash) या चित्रपटाद्वारे चांगलाच नफा कमावणार आहे. कारण, तो या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे. यशने रावणाची भूमिका करण्यास नकार दिला म्हटल्यावर आता हा रोल कुणाला दिला जाणार, याबाबत चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.
‘रामायण’ मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार
गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ या चित्रपटाच्या सेटवरून बरेच फोटो लीक होत आहे. या फोटोंमध्ये अभिनेते अरुण गोविल हे दशरथ यांच्या लूकमध्ये दिसले. तर अभिनेत्री लारा दत्त ही कैकेयीच्या भूमिकेत दिसून आली होती. या व्यतिरिक्त यशचेही (Kgf Star Yash) काही फोटो व्हायरल झाले होते. सेटवरील फोटो लीक झाल्यानंतर आता नितेश तिवारी यांनी ‘नो फोन पॉलिसी’ लागू केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर कोणालाच फोन वापरण्याची परवानगी नसणार आहे.
या चित्रपटात अभिनेता सनी देओल हनुमानाची भूमिका करणार आहे. तर, साऊथचा अभिनेता विजय सेतुपती विभीषणाची भूमिका करेल. याशिवाय अभिनेत्री रकुल प्रीत सिंह शूपर्णखाची भूमिका करणार असल्याची माहिती आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. आता या चित्रपटकडून ( Ramayana) चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. नितेश तिवारी ‘रामायण’ तीन भागात प्रदर्शित करणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
News Title- Kgf Star Yash Rejected Ravana roll In Ramayana
महत्त्वाच्या बातम्या –
RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू
ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच
या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल
‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास
आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?