दुसऱ्यांदा लग्न करुनही मन भरे ना; अभिनेता अरबाज खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर?

Arbaaz Khan | बाॅलिवूड अभिनेता अरबाज खानने अलीकडेच दुसऱ्यांदा विवाहगाठ बांधली. वयाच्या 56 व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढलेल्या अरबाज खानने त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत नुकतंच लग्न केलं. सोशल मीडियावर ही जोडी कायम ट्रोल होत असताना दिसते. अरबाज खान सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. दरम्यान दुसऱ्या लग्नानंतर देखील अरबाज पुन्हा लग्न करणार असल्याचं त्यानी म्हटलंय.

काय म्हणाला अरबाज?

अरबाज (Arbaaz Khan) आणि मलायका यांचा मुलगा अरहान खान याने डंब बीर्याणी नावाचं पाॅडकास्ट सुरु केलं आहे. या पाॅडकस्टमध्ये अरहानचे वडिल म्हणजेच अभिनेता अरबाज खानने हजेरी लावली होती. यावेळी वेगवेगळ्या गोष्टींवर गप्पा रंगल्या. यावेळी बोलत असताना अरबाज खानने एक खुलासा केला ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

अरबाज खान म्हणाला की, माझ्या लग्नाच्या वेळेस मी अरहानच्या अनेक मित्रांना फोन करुण बोलवलं होतं. मात्र, त्याचा एक मित्र देव याला फोन केला त्यावेळी तो म्हणाला की मला शक्य नाही.

पुढच्या लग्नात ये-

अरबाज खान (Arbaaz Khan) पुढे म्हणाला की, ज्यावेळेस मी देवला लग्नासाठी बोलवलं त्यावेळेस देव म्हणाला की, मला शक्य नाही. यावर मी म्हणालो की, मी त्यावेळी त्याला म्हटलं ठीक आहे. आता नाही तर पुढच्या लग्नात ये. अरबाज खानचं हे बोलणं ऐकून सर्वजण जोरजोरात हसायला लागतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by dumb biryani (@dumbbbiryani)

आता अरबाज खानच्या या विधानावरून हिच चर्चा रंगत आहे की, अरबाज खान हा तिसऱ्यांदा लग्न करणार? अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

अरहानचं वडिलांच्या पावलांवर पाऊल-

अरबाज खान आणि मलायका अरोरा हे 2017 मध्ये विभक्त झाले. या दोघांना अरहान खान हा मुलगा आहे. अरहानचा जन्म 2002 मध्ये झाला. आता तो 22 वर्षांचा आहे. अरहान आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत काम करणार का, असा प्रश्न अरबाजला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “अरहान आता इंडस्ट्रीत ‘हॉट प्रॉपर्टी’ झाला असून माझ्याआधी त्याला कोणी लाँच केलं तर आनंदच होईल.” त्याचसोबत बॉलिवूड पदार्पणाविषयीचा शेवटचा निर्णय हा अरहानचाच असेल, असंही त्याने स्पष्ट केलं होतं.

News Title : arbaaz khan to get married again?

महत्त्वाच्या बातम्या-

“मी ही कोणाची तरी बहिण, मुलगी….”, अमृता खानविलकर भडकली

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तोबा गर्दी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

घर बांधण्यासाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांची मदत

…ज्याला अ ब क येत नाही!, ठाकरेंच्या वाघिणीनं उडवली श्रीकांत शिंदेंची खिल्ली

तोंड दाबून बुक्क्यांचा मार!, अजित पवारांचे पन्नास टक्के उमेदवार आयात केलेले