सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तोबा गर्दी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan | ईदच्या निमित्तानं देशभर मुस्लिम बांधव एकत्र आले आहेत. आपला सण उत्साहात साजरा करत आहेत. अनेकजण बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या गॅलेक्सी अपार्टेमेंट बाहेर उभे राहत सलमान खानची (Salman Khan) वाट पाहत होते. अनेकदा सलमान खान (Salman Khan) हा आपल्या अपार्टमेंटबाहेर येत चाहत्यांना भेट देतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. ईद निमित्ताने सलमानच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर तोबा गर्दी केली होती.

पोलिसांना गर्दी हाताळताना नाहक त्रास सहन करावा लागला होता. सलमानला (Salman Khan) ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी पोस्टर्स आणले होते. गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यामुळे पोलिसांनी लाठी हल्ला करत गर्दी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सलमान खानला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या त्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी काही चाहते जमीनीवर आदळल्याचे देखील दिसत आहेत. सलमान खान हा आपल्या वाढदिवशी आणि ईदच्या दिवशी चाहत्यांना भेटतो. यामुळे चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)


वांद्रे येथे सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंट आहे. चाहते त्यांच्या घराबाहेर बारा महिने असतात. त्याच्या घराबाहेर फोटोशूट करतात. यामुळे त्याच्या घराबाहेर अनेकदा गर्दी झालेली दिसते. सलमान खान आपला नवीन सिनेमा रिलीज होण्याआधी आपल्या गॅलेक्सी आपार्टमेंटबाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतो.

सलमान खानचा सध्या किसी का भाई किसी की जान हा चित्रपट चर्चेत आहे. किसी का भाई किसी की जान हा सिनेमा आला आहे. या सिनेमामध्ये बिग बॉस फेम शहनाज गिल या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसत आहे.

News Title – Salman Khan Galaxy Apartment Home Around Fans Crowd

 

महत्त्वाच्या बातम्या

 

प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!

उन्हाळ्यात ‘ही’ फळे आवर्जून खायला हवीत!

“एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देणं ही मोठी चूक”, शरद पवारांची कबुली

पत्रकार परिषद घेत शरद पवारांची मोठी घोषणा!

‘या’ सरकारी योजनांमध्ये करा गुंतवणूक; मिळेल दुप्पट परतावा