Amruta Khanvilkar | मनोरंजन विश्वामध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या ड्रेसिंग सेन्समुळे ओळखल्या जातात. अभिनेते आणि अभिनेत्रींच्या पेहरावावरून अनेकदा चाहते आणि नेटकरी ट्रोलिंग करत असतात. अशातच आता मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरला (Amruta Khanvilkar) सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी डिवचलं आहे. त्यावर तिनं सडेतोड उत्तर दिलंय.
.
प्रत्येक माणसाची एक वेगळी खासियत असते. तो काम कुठे करतोय? तो किती कमाई करतोय त्यावरून त्याचं व्यक्तीमत्व आणि राहनीमान ठरलं जातं. मनोरंजन क्षेत्र हे फार वेगळं क्षेत्र आहे. यामध्ये अनेकांना अपार मेहनत करावी लागते. तेव्हा कुठे त्यांना यश मिळतं. अशातच त्यांच्या प्रोफेशनमुळे त्यांना त्यांचं राहनीमानही तसंच असतं. मात्र नेटकऱी नेहमी त्यांना ट्रोल करतात.
अमृताने तिच्या पेहरावावरून अक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांना सुनावलंय. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो आणि नवीन प्रोजेक्टबद्दलचे अपडेट ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अमृताने (Amruta Khanvilkar) सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाली अमृता खानविलकर?
“अभिनय क्षेत्रामध्ये असल्यानं कधीतरी चांगलं तर कधीतरी वाईट ऐकण्याची सवय लागली आहे. ट्रोलिंगच्या नावाखाली प्रेक्षक इतक्या घाण कमेंट्स आणि लाजिरवाण्या गोष्टी बोलतात की त्याची लाज वाटते. आशा करते तुमचा गुढीपाडवा चांगला साजरा झाला असेल. नवीन वर्षाची सुरूवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरुन केलीच असणार …नवीन मनोकामना … नवी स्वप्ने …देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार.” (Amruta Khanvilkar)
“मी ही कोणाची तरी बहिण, मुलगी….”
“जर तुम्ही हे सर्व केलंय तर तुमच्यासारखीच मी आहे. मी सुद्धा हे सर्व केलंय. मी ही नावाने नाहीतर धर्माने मराठी आहे. मूळची कोकणातली पण जन्म मुंबईचा आहे. मी ही कोणाची तरी बहिण आहे, मुलगी आहे, मैत्रीण आहे, मावशी आहे, बायको आहे आणि मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतेय म्हणून मी अभिनेत्री आहे.”
“जे लोक स्वतःचं खरं नाव किंवा साधा डिपी सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात? मज्जा वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे. सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांना करता येतो असं नाही. पण यावर तुम्ही जे लिहिता, बोलता यामुळे केवळ आपले संस्कार दिसतात”, असं लिहित अमृताने ट्रोलर्सना कडक शब्दात ठणकावून सांगितलं आहे.
News Title – Amruta Khanvilkar Aggressive On trollers
महत्त्वाच्या बातम्या
‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास
आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?
“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला
प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!