तोंड दाबून बुक्क्यांचा मार!, अजित पवारांचे पन्नास टक्के उमेदवार आयात केलेले

Sharad pawar Vs Ajit pawar | अनेक दिवसांपासून जागावाटपाचा तिढा कायम होता. मात्र आता तो तिढा सुटलेला दिसत असला तरीही महायुतीतील काही पक्षांच्या वाट्याला फारशा जागा आल्या नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना (Sharad pawar Vs Ajit pawar) धडा शिकवण्याच्या नादात स्वत: तोट्यात आहेत असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. कारण अजित पवार यांच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या. त्यातील दोन जागांवर उमेदवार आयात करण्यात आलेत.

अजितदादांना 4 जागांवर समाधान

शरद पवार यांचा पराभव करायच्या नादात अजित पवार चांगलेच तावडीत सापडले आहेत. शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून 10 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांना केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. (Sharad pawar Vs Ajit pawar)

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. शिरूर आणि धाराशिव य़ेथे त्यांनी उमेदवार आयात केले आहेत. (Sharad pawar Vs Ajit pawar)

धाराशिव आणि शिरूर मतदारसंघातून उमेदवार आयात

शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आलीये. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचेच उमेदवार आहेत. तर अजित पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा मिळाली. त्या जागेवर अजित पवार यांना त्यांचा उमेदवार देता आला नाही. यावेळी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी जाहीर करण्यात आली. थोडक्यात काय तर आढळराव पाटील देखील आयत असलेले उमेदवार आहेत. (Sharad pawar Vs Ajit pawar)

अशातच धाराशिव य़ेथून अजितदादा यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार सापडला नाही. यामुळे याठिकाणी भाजपचा उमेदवार आयात करावा लागणार आहे. तसेच नाशिक येथे देखील मंत्री छगन भुजबळ लढण्यास इच्छूक आहेत. मात्र अद्यापही नाशिकच्या जागेचा फैसला झाला नाही. जर भुजबळ यांना नाशिक येथून उमेदवारी दिली तर अजितदादांना दिलासा मिळेल. मात्र नाशिक जागा न मिळाल्यास अजितदादा यांचे दोन उमेदवार हे घरचे असतील. तर दोन उमेदवार हे बाहेरचे असतील.

News Title – Sharad Pawar Vs Ajit Pawar Loksabha Candidate Update

महत्त्वाच्या बातम्या

20 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडणार; कोण बाजी मारणार?

सिनेसृष्टीत शोककळा! साखरपुड्याच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू