…ज्याला अ ब क येत नाही!, ठाकरेंच्या वाघिणीनं उडवली श्रीकांत शिंदेंची खिल्ली

Kalyan Lok Sabha | कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) मतदारसंघात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आलीये. त्या काही दिवसांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, दोन्ही गटाकडून प्रचाराने जोर धरला. अशातच अंबरनाथ येथे वैशाली दरेकर गेल्या असता त्यांनी श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. (Kalyan Lok Sabha)

“…ज्याला अ ब क येत नाही!”

महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या अंबरनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पदाधिरकाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी बोलत असताना वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांना चांगलंच सुनावलं आहे. ” 2014 च्या निवडणुकीमध्ये ज्याला अ ब क येत नव्हतं त्याला शिवसेनेनं शिकवलं आहे.” असं म्हणत दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केलीये.  (Kalyan Lok Sabha)

“अ ब क म्हणजे काय माहिती आहे का? आपण जे काम करत आहे. आपल्या सभोवतालची परिस्थिती असेल किंवा आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे याबाबतचे विचार मेंदूतून क्लिअर असतात, कधी तो या ठिकाणी, त्या ठिकाणी असं करत नाही”, असं बोलत असताना मिमिक्री करून दाखवत श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांनी खिल्ली उडवली आहे.

“अंबरनाथ येथील कार्यकर्त्याला विचारलं ना की तुमचा प्रश्न काय? तर ते झटाझट सांगतील. कारण कार्यकर्ता, अंबरनाथमध्ये फिरतोय, जगतोय, अनुभवतोय त्याच्या डोक्यात सगळं फिट असतं”, असं वैशाली दरेकर म्हणाल्या.

बदलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला संबोधित करत असताना महाविकास आघाडीवर टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचं एकमेव इंजिन आहे. त्याला इतर डबे जोडले गेले आहेत. ही गाडी विकासाच्या दिशेने धावत आहे. महाविकास आघाडीची अवस्था पाहता त्यांनी स्वत:ला इंजिन म्हणून घोषित केलंय. त्यामुळे त्याच्या प्रत्येक इंजिनची दिशा ही वेगळी असल्याचा”, टोला फडणवीस यांनी लगावला आहे. यावर वैशाली दरेकर यांनी उत्तर दिलंय.

फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर

दरेकर म्हणाल्या की, “ठिक आहे. आमची भरकटलेली गाडी असु द्या, भरकटलेलं इंजिन असु द्या, तुम्ही जे इंजिन जॉईन करताय त्यातून तुमचा कितपत धूर निघतो ते बघा,” असं दरेकर म्हणाल्यात.

News Title – Kalyan Lok Sabha In Vaishali Darekar Aggressive On Shrikant Shinde

महत्त्वाच्या बातम्या

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडणार; कोण बाजी मारणार?

सिनेसृष्टीत शोककळा! साखरपुड्याच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल