जळगावात भाजप उमेदवार बदलणार?, उमेदवारीसाठी ‘या’ नेत्यानं गाठली दिल्ली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपासह महाविकास आघाडीमध्येही सध्या नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसतंय. तिकीट न मिळाल्याने कुणी पक्षाला रामराम ठोकत आहे तर कुणी थेट अपक्ष म्हणून आव्हान देत आहे. अशातच जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.

जळगाव येथे नाराज झालेले  यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. भाजपपासून विभक्त होत त्यांनी थेट भाजपला आव्हान दिलंय. पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना सोबत घेत उन्मेष पाटील यांनी भाजपाच्या स्मिता वाघ यांच्यासमोर उमेदवार म्हणून आव्हान उभं केलंय. यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

आता स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे. कारण, येथे पुन्हा स्मिता वाघांना पर्याय म्हणून माजी खासदार ए.टी.पाटील यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी करण्यात येत आहे. ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीमुळे सलग दुसऱ्या टर्मला जळगावात भाजपावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

स्मिता वाघ यांना जाहीर झालेलं तिकीट कापणार?

उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना सोबत घेऊन ठाकरे गटाची मशाल घेत भाजपापुढं आव्हान ठेवलं आहे. करण पवार यांची पारोळा-एरंडोल मतदारसंघात ताकद असल्याने स्मिता वाघ यांच्या विजयाबाबत (Lok Sabha Election 2024) सांशकता निर्माण झाली आहे. म्हणूनच येथे भाजपा थेट उमेदवारच बदलणार, अशी जोरदार चर्चा आहे.

यासाठीच माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या भेटीगाठी सुरू असल्याची माहिती आहे. ए. टी. पाटील यांचं 2019 मध्ये तिकीट कापण्यात आलं होतं. पण उन्मेष पाटील यांच्या बंडखोरीमुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांना संधी देण्याबाबत भाजपकडून सध्या चाचपणी केली जात आहे.

ए.टी.पाटील यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता

जळगावमध्ये पाटील (Lok Sabha Election 2024) यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अॅड. रोहित पाटील यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. मागील काही दिवसांत ए.टी.पाटील यांनी दिल्ली भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आता स्मिता वाघ यांचं तिकीट कापलं जाईल की पाटील यांना संधी दिली जाईल, याकडे सर्वांच्या नजरा असतील.

News Title : Lok Sabha Election 2024 Jalgaon Bjp Candidate Smita Wagh Ticket May Cut

महत्त्वाच्या बातम्या-

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडणार; कोण बाजी मारणार?

सिनेसृष्टीत शोककळा! साखरपुड्याच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल