आरसीबी विरुद्ध विकेट्सचा ‘पंच’, बूमराहने पटकावली पर्पल कॅप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल (12 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना झाला. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील हा 25 वा सामना होता. मुंबईने बंगळुरूविरोधात 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मुंबईकडून बूमराह हा विजयाचा शिल्पकार ठरला.

बुमराहने आरसीबीला लागोपाठ विकेट्स धक्के दिले. त्याने आरसीबीचे 5 विकेट्स घेतले. त्यामुळे आरसीबीला 200 पार मजल मारता आली नाही. आरसीबीने मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 27 बॉल राखून 3 विकेट्स गमावून 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

जसप्रीत बुमराह पर्पल कॅपचा मानकरी

बुमराहने सामन्यातील पहिल्या डावात आरसीबी विरुद्ध सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. बुमराहची आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध 5 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यासोबतच बूमराहने अजून एक विक्रम केला. बुमराह आयपीएलच्या इतिहासात आरसीबी विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला.

यापूर्वी त्याने केकेआर विरुद्धच्या सामन्यात (IPL 2024 ) 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर, आरसीबीविरुद्ध त्याने दुसऱ्यांदा ही कामगिरी केली. आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, महिपाल लोमरुर, सौरव चौहाण आणि विजयकुमार वैशाख या 5 जणांना बूमराहने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

आरसीबी विरुद्ध सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या

बूमराहने या कामगिरीसोबत काल पर्पल कॅप पटकावली. चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिजुर रहमान याला पछाडत मानाच्या पर्पल कॅपचा बूमराह मानकरी ठरला. त्यामुळे मुस्तफिजुरची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली. सध्या दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे.

चहल आणि बुमराहच्या नावावर संयुक्तरित्या 10 विकेट्स आहेत. पण, बुमराहचा इकॉनॉमी रेट हा चहलच्या तुलनेत जास्त (IPL 2024 )असल्याने तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला. आता चौथ्या स्थानी पंजाबचा अर्शदीप सिंह आणि पाचव्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा मोहित शर्मा आहे.

News Title :  IPL 2024 Jasprit Bumrah Purple Cap Holder

महत्त्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?

“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला

प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!