Ambedkar-Gandhi | वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडत आपली वेगळी चूल मांडलीये. त्यांनी महाविकास आघाडीविरोधात देखील आपले उमेदवार दिले आहेत. वंचितची रणनीती महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Ambedkar-Gandhi) यांना पटली नाही. म्हणून आता वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांना मतदान न करण्याचं आवाहन त्यांनी दिलंय. (Ambedkar-Gandhi)
“वंचितला मतदान करू नका”
गेल्या काही दिवसांपासून वंचितला महाविकास आघाडीमध्ये येण्याची ऑफर होती. मात्र वंचितचं जागावाटपावरून फिसकटल्यानं त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असं तुषार गांधी यांचं म्हणणं आहे. यामुळे तुषार गांधी यांनी वंचितला मत न देण्याचं आवाहन केलंय. (Ambedkar-Gandhi)
देशामध्ये इंडिया आघाडी विरूद्ध एनडीए अशी लढत होणार आहे. तर राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत आहे. भाजपच्या महायुतीला तुषार गांधी यांनी गद्दारांची युती म्हटलंय. राज्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे, असं तुषार गांधी म्हणालेत. (Ambedkar-Gandhi)
“आंबेडकर यांचा स्वार्थ”
“प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मित्रभाव आहे. मात्र त्यांनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून त्यांनी एकत्र यायला हवं होतं. त्यांच्या अशा भूमिकेनं भाजपला फायदा होणार ना. ते या टीकेला पात्र आहेत,” असं तुषार गांधी म्हणालेत.
“ही लढाई लोकशाही विरूद्ध हुकुमशाहीची आहे. संविधान वाचवण्याची आहे. महाविकास आघाडीला मतदान करा असं आम्ही सांगणार आहोत. यासाठी वंचित आणि एमआयएमवर मत करू नका”, असं सांगण्यात आलंय.
News Title – Ambedkar-Gandhi Tushar Gandhi Say Do Not Vote Prakash Ambedkar
महत्त्वाच्या बातम्या
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! JEE 2024 च्या वेळापत्रकात बदल, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ
भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?
राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना