विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! JEE 2024 च्या वेळापत्रकात बदल, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

JEE Advanced 2024 Registration Date l विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) 2024 साठी नोंदणीचे वेळापत्रक सुधारित केले आहे. जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार JEE Advanced 2024 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 27 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर विद्यार्थी 7 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया 21 एप्रिलपासून सुरू होणार होती आणि ती 30 एप्रिलपर्यंत चालणार होती. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. उमेदवार jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक तपासू शकतात.

JEE Advanced 2024 साठी नोंदणी कशी करावी? :

मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल केलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी. JEE Advanced 2024 ची परीक्षा 26 मे 2024 रोजी देशभरातील नियुक्त केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेत दोन पेपर असणार आहेत. यामध्ये पहिल्या शिफ्टमध्ये पेपर 1 ची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर 2 ची परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे.

– सर्वात प्रथम JEE Advanced jeeadv.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– त्यानंतर मुख्यपृष्ठावर दिलेल्या नोंदणी टॅबवर क्लिक करा.
– त्यानंतर तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा आणि फॉर्म भरा.
– पुढे कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.

JEE Advanced 2024 प्रवेशपत्र कधी जारी केले जाईल? :

JEE Advanced परीक्षा 2024 साठी अर्ज करणारे उमेदवार 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज शुल्क जमा करू शकतात. नोंदणीसाठी 3200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आली आहे. महिला आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1600 रुपये आहे.

प्रवेशपत्र 17 मे रोजी सकाळी 10 वाजता जारी केले जाईल, जे उमेदवार त्यांच्या नोंदणी क्रमांकाद्वारे डाउनलोड करू शकतात. कोणत्याही उमेदवाराला हॉल तिकीटाशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. अधिक माहितीसाठी तुम्ही JEE Advanced च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

News Title : JEE Advanced 2024 Registration Date

महत्त्वाच्या बातम्या : 

दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ

भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल