राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | या आठवड्यात विदर्भासह मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. काही भागात अवकाळी पाऊस पडून गेला आहे. आज पुन्हा हवामान बिघडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्यांची द्रोणीका रेषा ही सौराष्ट्र कच्छ लगतच्या भागावर असलेल्या चक्रीय स्थिती पासून ते कर्नाटक पर्यंत जात आहे. तसेच ही रेषा मध्य महाराष्ट्रातून देखील जाते. त्यामुळे राज्यातील किनारपट्टीवर तरी पावसाची शक्यता नाही. तसेच कोकण, गोव्यात देखील पावसाची शक्यता नाही.

‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट

आज (13 एप्रिल) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, येथे, तर उर्वरित राज्यात पुढील दोन ते तीन दिवस विजांचा कडकडाट व वादळीवारासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. आज मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात तापमानामध्ये थोडी घट झाली (Maharashtra Weather Update) असली तरी 15 एप्रिल नंतर पावसाची शक्यता कमी होणार असल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा उष्णतेच्या लाटा वाहतील. सध्या ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही प्रमाणात उषणा कमी झाली आहे. पण, दोन दिवसांनी पुन्हा तापमान वाढेल.

पुण्यात कसं राहील तापमान?

पुणे व परिसरामध्ये 14 एप्रिलपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील व 15 एप्रिलला हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात शुक्रवारी तापमान 38 डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले. सध्या पुण्यात देखील हवामान ढगाळ असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

News Title : Maharashtra Weather Update Rain alert

महत्त्वाच्या बातम्या- 

दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ

भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल