दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Points Table Update l आयपीएल 2024 च्या 26 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने लखनौचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या संघाने विजयासह झेप घेतली आहे, तर लखनौला मोठा फटका बसला आहे.

IPL 2024 Points Table Update l पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल :

या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ 10व्या स्थानावर होता. मात्र आता दिल्लीचा संघ एका पॉइंटने वर गेला आहे. आता दिल्ली 4 गुण आणि -0.975 च्या रन रेटसह नवव्या स्थानावर आली आहे. पराभूत झालेल्या लखनौला एक जागा गमवावी लागली आहे. सामन्यापूर्वी लखनौ सुपर जायन्ट्स तिसऱ्या क्रमांकावर होता, जो आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. लखनौचे 6 गुण आहेत आणि निव्वळ रन रेट +0.436 आहे.

या मोसमात आतापर्यंत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर KKR, CSK आणि लखनौ सुपर जायंट्स 6-6 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. KKR चा निव्वळ रन रेट +1.528 आणि CSK चा +0.666 आहे.

RCB ची परिस्थिती अत्यंत बिकट :

IPL च्या बाकी संघांबद्दल बोलायचे झाले तर, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघ प्रत्येकी 6 गुणांसह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. हैदराबादचा निव्वळ रन रेट +0.344 आणि गुजरातचा -0.637 आहे.

तसेच त्यानंतर मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. मुंबईचा निव्वळ रन रेट -0.073 आणि पंजाबचा -0.196 आहे. त्यानंतर पॉईंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या 10व्या स्थानावर आहे.

News Title : IPL 2024 Points Table Update

महत्त्वाच्या बातम्या : 

भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल

सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, उचललं मोठं पाऊल