“…तर राम मंदीर उभारलं नसतं”, राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरुन कौतूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा घेत काही गोष्टींबाबत खुलासे केले. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान राज ठाकरेंनी अमित शहा यांना भेटण्यामागचं कारण देखील सांगितलं. दरम्यान, राज ठाकरे यांनी आज एमआयजी क्लब येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवाय त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? याबाबत स्पष्टीकरण दिलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

माध्यमांशी बोलत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत बरेच महत्त्वाचे विषय मार्गी लागले. यावेळी त्यांनी राम मंदीराबाबत देखील भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदींमुळे आज राम मंदीराचं काम पूर्ण झालं. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असं आपणास आणि पक्षाला वाटलं, आणि म्हणून मनसेने महायुतीला पाठिंबा दिला.

मोदींना संधी देणं आवश्यक-

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बैठकीमध्ये अनेक विषयांबाबत वक्तव्य केली. यावेळी ते म्हणाले, मी अनेक वेळा पंतप्रधान यांच्या धोरणांचा विरोध सुद्धा केला. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मला असं वाटत आहे की, मोदींना पुन्हा एकदा एक संधी देणं गरजेचं आहे. म्हणूच पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

आता महाराष्ट्रासाठी आपल्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा संरक्षण, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा विषय आहे.”

मोदींकडे अपेक्षा आहेत-

पुढे ते म्हणाले की, “या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे.  मनसेचा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.”

News Title : Raj Thackeray supports narendra modi

वसंत मोरेेंचा यू टर्न?, पुन्हा मनसेत जाणार?

तुमचा मित्र तुमच्या प्रेमात वेडा झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनदर

कमी बजेटवाल्यांसाठी आनंदाची बातमी; भन्नाट फीचर्ससह Infinix Note 40 Pro 5G सीरीज लाँच

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट!