वसंत मोरेेंचा यू टर्न?, पुन्हा मनसेत जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More | वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकत वंचितचा हाथ धरला. लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने त्यांनी मनसेची साथ सोडली. त्यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिलं आहे. वसंत मोरे आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत. अशात त्यांच्या एका वक्तव्याची राजकारणात चर्चा रंगली आहे.

“पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती करून सांगितलं की, कृपया मला फोन देऊ नका. मी राज साहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचंच नाहीये. मला आग्रह करुन साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल.”, असं वसंत मोर म्हणाले आहेत.

वसंत मोरे राज ठाकरेंची भेट घेणार?

इतकंच नाही तर, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. पण, काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असंही मोरे म्हणाले आहेत. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. याशिवाय ते लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

पुण्यात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळालं आहे. त्यांच्याविरोधात वंचितकडून मोरे यांनी आव्हान दिलं असल्याने पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. यामुळे वसंत मोरे (Vasant More) आता राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत.

‘पुण्यात आपलाच विजय होणार’

‘आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत 25 वर्षे राहिलो आहे. मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात.’, असं वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितलं. आता राज ठाकरे मोरे यांच्या भेटीनंतर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष राहील. त्यातच पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी बिनशर्त भाजपला पाठिंबा दिला आहे. अशात मोरे यांना ते पाठिंबा देणार का?, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, वसंत मोरे यांनी पुण्यात आपणच विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘पुण्यात ना भाऊ, ना अण्णा, असे कोणाचे राजकारण चालणार नाही. आपलेच तात्यांचे (वसंत मोरे) राजकारण चालणार आहे.’, असं मोरे यांनी सांगितलं.

News Title : Vasant More will meet Raj Thackeray  

महत्त्वाच्या बातम्या-

तुमचा मित्र तुमच्या प्रेमात वेडा झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी! जाणून घ्या तुमचे शहरातील आजचे इंधनदर

कमी बजेटवाल्यांसाठी आनंदाची बातमी; भन्नाट फीचर्ससह Infinix Note 40 Pro 5G सीरीज लाँच

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! JEE 2024 च्या वेळापत्रकात बदल, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज