सुजय विखे पाटलांची डिग्री बोगस?; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे नगरमध्ये खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sujay Vikhe | देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. अशात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) अडचणीत सापडल्याचं दिसतंय.

सुजय विखे पाटलांची डिग्री बोगस?

सुजय विखे (Sujay Vikhe) पाटलांची डिग्री बोगस असल्याचा धक्कादायक दावा सुजय विखे विखेंच्याच कुटुंबातील व्यक्तीने केल्याने नगरमध्ये खळबळ माजली आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात सुजय विखेंचे सख्खे काका अशोक विखे सुजय विखेंवर टीका करत असल्याचं दिसतंय.

अशोक विखेंनी सुजय विखेंच्या वैद्यकीय पदवीवर भाष्य करत अत्यंत गंभीर आरोप केलाय. अशोक विखेंचा हा व्हिडीओ 2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच्या प्रचारसभेतला आहे. यावेळी बोलताना अशोक विखेंनी अत्यंत गंभीर आरोप केले होते.

अशोक विखेंनी डॉ. सुजय यांच्या शिक्षणाबद्दल संशय व्यक्त केला. सुजय यांची पदवी खासगी विद्यापीठातील आहे. खासगी विद्यापीठाचा दर्जा आपल्याला माहिती आहेच. शिवाय त्यांचे काही शिक्षण लोणीत झाले तेव्हा परीक्षा कशा दिल्या, याचीही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते कितीही हुशार असल्याचा दावा करीत असले तरी खरी परिस्थिती आपल्याला माहिती असून त्यांनी आजतागायत काहीही कमावलेलं नाही, असं अशोक विखे म्हणालेत.

निलेश लंके विरूद्ध सुजय विखे

दरम्यान, अहमदनगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके यांचा सामना जोरदार रंगेल असं नागरिक म्हणतायेत. 2019 ला राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचं फक्त नगर शहरापुरतंच वर्चस्व असल्यामुळे सुजय विखेंनी सहज विजय मिळवला. पण शरद पवारांनी ऐनवेळी अजित पवार गटातल्या निलेश लंकेंना उमेदवारी देऊन ही लढत चुरशीची केली आहे. दोघेही तयारीला लागले असून पायाला भिंगरी लावून दोघेही उमेदवार अगदी जनसामान्यांपर्यंत जात प्रचार करत आहेत.

आमदारांची संख्या लक्षात घेतली तर नगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं बळ समसमान आहे, पण कोणता नेता किती मतं घेतो यावर लोकसभेचा विजय ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सभा घेणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

फिट अँड फाईन लाईफस्टाइलसाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

“वंचितला मतदान करू नका”; प्रकाश आंबेडकरांविरोधात ‘हा’ नेता मैदानात मैदानात

“…तर राम मंदीर उभारलं नसतं”, राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरुन कौतूक

वसंत मोरेेंचा यू टर्न?, पुन्हा मनसेत जाणार?