“दात निघालेला शक्तीहीन आणि तोंडानं हवा मारणारा वाघ लोकांना नको”

Raj Thackeray

Kishori Pednekar | आगामी लोकभेच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचं वक्तव्य केलंय. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर राज्यभरातून टीका होताना दिसत आहे. मनसेतून बाहेर पडत अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. तसेच महाविकास आघाडीने राज ठाकरेंवर टीका केलीये. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली आहे.

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरे यांनी मोदींना दिलेल्या पाठिंब्यावर बोचरी टीका केली. “दात निघालेला शक्तीहीन आणि तोंडानं हवा मारणारा वाघ लोकांना नको” अशी टीका किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली आहे. मुंबईमध्ये शनिवारी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका

“मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा पत्रकार परिषद का घेतली? असा सवाल आता किशोरी पेडणेकर यांनी केला. राज ठाकरे म्हणतात की पक्ष निवडून आल्यावर इतर पक्षाची भूमिका बदलली जाते. मग मी का भूमिका बदलू नये? मात्र राज ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून सतत भूमिका बदलत आहेत,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

“तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नको”

“2019 रोजी लावा रे तो व्हिडीओ त्यांचं टॅगलाईन प्रसिद्ध झाल होतं. त्यानंतर पक्षाचा झेंडा देखील बदलण्यात आला. त्यामुळे असा दात निघालेला, नखं काढलेला, शक्तीहीन आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नको आहे,” असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज ठाकरे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी मोदींना पाठिंबा देण्यामागचं खरं कारण सांगितंय. ते म्हणाले की मोदींनी काही प्रलंबित प्रश्न सोडवलेत. राम मंदिरासारखा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. म्हणून आता राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दाखवला असल्याचं सांगितलंय.

मनसे महायुतीचा प्रचार करणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काम देण्यात येणार असून संबंधित यादी देखील तयार करण्यात येणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.

News Title – Kishori Pednekar Aggressive On Raj Thackeray About Support To Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .