‘…म्हणून नरेंद्र मोदींना एक संधी दिली’; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळावा आयोजित केला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे काही मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर शनिवारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एमआयजी क्लबमध्ये बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना माध्यमांनी त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला?, असा प्रश्न केलाय त्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दित महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यात त्यांना यश मिळालंय. नरेंद्र मोदींमुळे राम मंदिर झालं. मोदींच्या धोरणामुळे त्यांना आणखी पाच वर्षे संधी देण्यात यावी असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलंय.

“…तर राम मंदिर झालंच नसतं”

“देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा मुद्दा प्रलंबित होता. देशात 1992 पासून ते आतापर्यंत राम मंदिरासाठी कारसेवकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं आहे. त्यावेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या. त्यांची प्रेतं शरयू नदीमध्ये फेकण्यात आलीत. राम मंदिरासाठी हे आंदोलन दिर्घकाळासाठी सुरू होतं. राम मंदिरासाठी न्यायालयाचा निर्णय असला तरीही नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर तयार झालं नसतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

मोदींना पाठिंबा देण्याचं सांगितलं कारण…

“मी मोदी यांच्या निर्णयाचा विरोध केला होता. मात्र त्यांनी पुन्हा एकदा घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं आहे. म्हणून पक्षानं महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रासाठी आपल्या काही मागण्या आहेत. त्या मागण्या त्यांच्यापर्यत पोहोचतील. महाराष्ट्रातील गडकिल्ल्याचं संरक्षण, मराठी भाषेला अभिजात दर्जा हवा आहे. असे काही विषय मार्गी लागतील”, असं राज ठाकरे म्हणालेत.

मनसे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करणार आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कोणाशी संपर्क साधावा त्याबाबत दोन-तीन दिवसात त्याची यादी काढली जाईल. निवडणूक प्रचार मोहिमेत आमच्या लोकांना सन्मान मिळेल. महायुतीचा प्रचार करावा असं महायुतीच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना सांगण्यात आल्याचं कळतंय.

महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याबाबतही राज ठाकरेंनी सांगितलं. प्रचार सभांना संबोधित करायचं की नाही याबाबत काहीही ठरवलेलं नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.

News Title – Raj Thackeray Support PM Modi Statement

महत्त्वाच्या बातम्या

“…तर राम मंदीर उभारलं नसतं”, राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरुन कौतूक

वसंत मोरेेंचा यू टर्न?, पुन्हा मनसेत जाणार?

तुमचा मित्र तुमच्या प्रेमात वेडा झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनदर

कमी बजेटवाल्यांसाठी आनंदाची बातमी; भन्नाट फीचर्ससह Infinix Note 40 Pro 5G सीरीज लाँच