प्रेमानंद महाराज यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

Premanand Maharaj | प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आलीये. त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या छातीत दुखायला लागलं असल्याची माहिती समोर आलीये. त्यांना राम कृष्ण सेवा आश्रम रूग्णालयामध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर त्यांना रात्री रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

प्रेमानंद महाराज यांची प्रकृती स्थिर

प्रेमानंद महाराज यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. प्रेमानंद महाराज हे केवळ मथुरा आणि वृंदावनमध्येच प्रसिद्ध नाहीतर ते सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्राम, ट्वीटर आणि फेसबुकवर त्यांना अनेक लोक फॉलो करतात. त्यांचे व्हिडीओ आणि रिल्स सतत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

सेलिब्रिटी प्रेमानंद महाराजांच्या भेटीला

वृंदावनमध्ये अभिनेते, गायक, इतर काही व्हिआयपी मंडळी, क्रिकेटर या महाराजांकडे आपला वेळ काढून येत असतात. प्रेमानंद महाराज यांचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

संघसंचालक डॉ. मोहन भागवत, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. प्रेमानंद यांची तब्येत बरी व्हावी म्हणून भाविक सोशल मीडियावर प्रार्थना करत आहेत. व्यक्त होताना दिसत आहेत. त्यांचे व्हिडीओ, ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका ऋचा शर्मा यांनी प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली होती. अनेक कलाकारांनी प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जातंय.

News Title – Premanand Maharaj Health Update

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, बारामतीत नेमकं काय घडलं?

‘2019 पासून राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र?’, ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

पत्नीसह 9 महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या, कारण वाचून उडेल थरकाप

सोनं गाठणार 75 हजारांचा टप्पा?, इतक्या वधारल्या किंमती

“गादीचा आदर तसूभर…”, छत्रपती उदयनराजेंचं नाव घेत किरण माने स्पष्टच बोलले