‘2019 पासून राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र?’, ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Omprakash Rajenimbalkar | राष्ट्रवादीचे आता दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी बंड करत शरद पवारांशी फारकत घेतली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दादेखील चर्चेत आला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या सहमतीनेच आम्ही भाजपत गेल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. या वक्तव्यानंतर राजकारणात सध्या याचीच चर्चा होत आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही 2019 ला राष्ट्रवादी सोडली. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

मल्हार पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि विद्यमान उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी थेट अजित पवारांनाच सवाल केला आहे. 2019 पासूनच राष्ट्रवादी फोडायचं षडयंत्र चालू होतं काय?, याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी द्यावं, असं ओमराजे म्हणाले आहेत. त्यांनी अजित पवार यांना थेट आव्हान दिलं आहे.

‘अजित पवारांच्या सांगण्यावरूनच भाजपत..’

2019 ला अजित पवार यांच्या सहमतीनेच डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपत प्रवेश केला होता. अजित पवार यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि त्यानंतर ते स्वतः भाजपसोबत आल्याचा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता अजित पवार विरोधकांच्या टार्गेटवर आहेत.

मल्हार पाटील यांच्यावर ओमराजे निंबाळकरांनी (Omprakash Rajenimbalkar) हल्लाबोल करत अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवार आता याला काय उत्तर देणार? हे पाहावं लागेल. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाने पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे.

ओमराजे निंबाळकरांचं अजित पवारांना आव्हान

महायुतीकडून ही जागा अजित पवार गटाला मिळाली आहे. येथे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अर्चना पाटील आणि निंबाळकर या दोन्ही नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे येथे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

त्यातच मल्हार पाटील यांच्या गौप्यस्फोटामुळे अजित पवार यांना ओमराजे निंबाळकरांनी (Omprakash Rajenimbalkar) टार्गेट करत त्यांना आव्हान दिलं आहे. आता यावर अजित पवार काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं ठिकठिकाणचं राजकीय वातावरण गरम होत असल्याचं चित्र या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे.

News Title : Omprakash Rajenimbalkar Target Ajit Pawar  

महत्त्वाच्या बातम्या-

सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सभा घेणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

फिट अँड फाईन लाईफस्टाइलसाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

“वंचितला मतदान करू नका”; प्रकाश आंबेडकरांविरोधात ‘हा’ नेता मैदानात मैदानात

“…तर राम मंदीर उभारलं नसतं”, राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरुन कौतूक

वसंत मोरेेंचा यू टर्न?, पुन्हा मनसेत जाणार?