पत्नीसह 9 महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या, कारण वाचून उडेल थरकाप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यामध्ये (Jalgaon Crime) पतीने आपल्या पत्नीला आणि आपल्या पोटच्या 9 महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या केलीये. घडलेल्या घटनेमुळे जळगावमध्ये खळबळ माजलीये. या घटनेमुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पत्नी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला माहेरी घेऊन गेली होती. त्यानंतर त्याठिकाणी पती देखील आला. त्यावेळी पतीने आपल्या पत्नीची आणि 9 महिन्याच्या बाळाची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Jalgaon Crime)

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील ही घटना आहे. 9 महिन्यांचं बाळ आणि त्याच्या आईलचा धारधार शस्त्रानं गळा चिरून तो पती तिथून फरार झाला. पतीचं नाव हे विशाल झनके आहे. पत्नीचं नाव हे प्रतिभा झनके आणि मुलीचं नाव हे दिव्या झनके आहे. (Jalgaon Crime)

क्रूरपणे हत्या

विशाल झनके हा मलकापुर तालुक्यातील दुधलगाव येथे राहतो. त्याचं सासर हे देऊळगाव गुजरी आहे. 12 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता त्याच्या सासरवाडीत कोणीच नव्हतं. त्यावेळी त्याठिकाणी पती मलकापुर येथे आला त्यावेळी त्याने आपल्या पत्नीची आणि चिमुरडीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर पुन्हा तो मलकापुर येथे परतला.

स्वत:चंही जीवन संपवलं

मलकापुर तालुक्यातील दुधलगाव येथे परतल्यानंतर पतीने स्वत:चं जीवन संपवलं. या घटनेची नोंदी फत्तेपूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलीये. या हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा हदरला आहे. विशाल झनके यानं हे कृत्य बायकोसोबतच्या वादामुळे केलं असल्याचं कळतंय.

खुनाची घटना ही विशाल झनकेच्या सासरी घडली होती. त्यामुळे याचा तपास उशीरा लागला. विशाल झनके हा जेव्हा आपल्या सासरी आला तेव्हा त्यानं आपल्या थोरल्या मुलीला घरीच ठेवलं होतं. त्यानंतर काही तासांनंतर घडलेला प्रकार ग्रामस्थांच्या डोळ्यासमोर आला.

News Title – Jalgaon Crime News About Husband Killed His Wife And Child Daughter

महत्त्वाच्या बातम्या

तुमचा मित्र तुमच्या प्रेमात वेडा झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी! जाणून घ्या तुमचे शहरातील आजचे इंधनदर

कमी बजेटवाल्यांसाठी आनंदाची बातमी; भन्नाट फीचर्ससह Infinix Note 40 Pro 5G सीरीज लाँच

Realme च्या ‘या’ 5G फोनवर तब्बल इतक्या हजारांचा मिळणार डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर्स

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट!