सोनं गाठणार 75 हजारांचा टप्पा?, इतक्या वधारल्या किंमती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | सोने आणि चांदीच्या किमतीने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड तोडले आहेत. सोनं या महिन्यात 72 हजारांवर गेलं आहे. लवकरच याचे दर 75,000 रुपये पार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांची सराफ बाजारात एकदमच गर्दी कमी झाली आहे. या काळात विवाह सोहळे अधिक असतात. अशात मौल्यवान धातू सोनं महागल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.

लोकसभा निवडणूक, चीनच्या कुरघोड्या आणि डॉलरच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत रुपयाची झालेली मोठी घसरण या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे. सोन्यासोबतच चांदीदेखील तेजीत आहे. चांदी तर आता थेट 90 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सोन्याची जोरदार आघाडी

एप्रिलच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत सोन्याने जोरदार आघाडी घेतली. या (Gold-Silver Rate Today)आठवड्यातही याचे भाव तेजीत आहेत. 9 एप्रिल रोजी सोन्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. 10 एप्रिल रोजी 350 रुपयांनी भाव वधारले. 11 एप्रिल रोजी सोने 100 रुपयांनी तर 12 एप्रिल रोजी तब्बल 1,000 रुपयांनी किंमती वधारल्या.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 67,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या महिन्यात चांदीचे भावही सुसाट आहेत. या 10 दिवसांत चांदी 8 हजारांनी महागली.

चांदीचे भावही तेजीत

8 एप्रिल रोजी चांदी एक हजारांनी (Gold-Silver Rate Today)महागली. 9 एप्रिलरोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. काल 10 एप्रिल रोजी चांदीत पुन्हा हजारांची भर पडली. तर, 12 एप्रिल रोजी चांदीने 1500 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

गुडरिटर्न्सनुसार, 24 कॅरेट सोने 73,174 रुपये, 23 कॅरेट 72,881 रुपये, 22 कॅरेट सोने 67,027 रुपये झाले. 18 कॅरेट 54,881 रुपये, 14 कॅरेट सोने 42,807 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर तथा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने याच्या भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today April 13 

महत्त्वाच्या बातम्या- 

दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ

भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल