सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, बारामतीत नेमकं काय घडलं?

Baramati Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आलीये. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष हे बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाकडं लागलंय. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) निवडणूक दिवसेंदिवस रंजक होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काका शरद पवार यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अजित पवार यांनी मंगळवारी बारामती येथे पवार आडनावाला मत द्या, असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर शरद पवार यांनी अजित पवार यांचा खरपूस समाचार घेतला. (Baramati Lok Sabha)

अजित पवार यांनी मंगळवारी पवार आडनावाला मतदान करण्याचं आवाहन केलं. आधी मुलीला तीन वेळा निवडून दिलं. आता सूनेला निवडून द्या, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी मूळ पवार हे वेगळे आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. (Baramati Lok Sabha)

शरद पवार यांनी नाव जरी घेतलं नसलं तरीही त्यांचा पूर्णपणे रोख हा सुनेत्रा पवार यांच्यावर होता हे दिसून आलंय. याबाबत सुनेत्रा पवार यांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या भावूक झाल्या.

डोळ्यांना रूमाल लावत सुनेत्रा पवार भावूक

सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांनी बाहेरचे पवार असा उल्लेख केला. त्याबाबत माध्यमांनी विचारल्यावर सुनेत्रा पवार या निरूत्तर झाल्या. मात्र त्यांनी मान हलवत डोळ्याला रूमाल लावला आणि त्या रडू लागल्या. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांना अश्रू अनावर झाले.

महायुतीकडून शरद पवार यांच्यावर टीका

शरद पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या रूपाली पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली. शरद पवार हे पोटच्या पोरीसाठी धृतराष्ट्र झालेत, असं रूपाली पाटील म्हणाल्यात.

लेकीसाठी राजकारणात तुम्ही तुमचे विचार बदलले. हे वाक्य, महाराष्ट्रातल्या समस्त लग्न करुन सासरी गेलेल्या सुनांचा अपमान आहे, असं शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय.

News Title – Baramati Lok Sabha In Sunetra Pawar Crying On Sharad pawar Statement

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सभा घेणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

फिट अँड फाईन लाईफस्टाइलसाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

“वंचितला मतदान करू नका”; प्रकाश आंबेडकरांविरोधात ‘हा’ नेता मैदानात मैदानात

“…तर राम मंदीर उभारलं नसतं”, राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरुन कौतूक

वसंत मोरेेंचा यू टर्न?, पुन्हा मनसेत जाणार?