सांगलीत काँग्रेसचं टेंशन वाढलं; विशाल पाटलांना थेट ‘या’ पक्षातून ऑफर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | सांगली लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सांगली स्थानिक काँग्रेस नेत्यांचा सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार देण्याला विरोध होता. याबाबत अनेकदा विशाल पाटील यांनी दिल्लीत जात काँग्रेस वरिष्ठांशी भेट घेतली. मात्र तरीही काहीही झालं नाही. मात्र आता विशाल पाटील वेगळा मार्ग निवडणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी विशाल पाटील यांना साथ देणार असल्याचं म्हटलंय.

सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापही स्थानिक काँग्रेस नेत्यांचा राग शांत झाला नाही. लवकरच स्थानिक काँग्रेस नेते विशाल पाटील हे बंड करणार असल्याच्या चर्चा आहेत. सांगलीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरील नाव खोडण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील हे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भेटीला गेले होते.

सांगलीमध्ये राजकीय वातावऱण तापलं असून काँग्रेसची कोंडी होण्याची अधिक शक्यता आहे. कारण विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील हे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या भेटीत झालेल्या चर्चेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिलाय. उमरेडच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर बोलत असताना त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलंय.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

उमरेडच्या सभेमध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलंय. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत असताना महाविकास आघाडीच्या डोकेदुखीत आणखी वाढ होऊ लागलीये. “सांगलीमध्ये ठाकरे गटाची ताकद नसून काँग्रेसची ताकद आहे. प्रतिक पाटील आम्हाला भेटून गेलेत. त्यांना आम्ही पाठिंबा देऊन निवडून देऊ अशी ग्वाही दिलीये,” असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

“विशाल पाटील यांना निवडून आणू”

“चार दिवसांपूर्वी विशाल पाटील आले आणि म्हणाले की काय करायचं? म्हटलं हिंमत असेल तर लढा, आम्ही पाठिंबा देतो. आता त्यांच्या हिंमत आहे की नाही हे पाहायचं आहे. ते लढले तर पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणू”, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केलीये.

राहुल गांधी यांनी याआधी मॅचफिक्सिंग असा उल्लेख केला होता. आता प्रकाश आंबेडकर यांनी त्याचाच समाचार घेतला आहे. “राहुल गांधी यांनी मॅचफिक्सिंग असा उल्लेख केला होता. मात्र आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तो शब्दप्रयोग खरा उतरवलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतून जो उमेदवार दिलाय. तो उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाविरोधात निवडणूक लढू शकत नाही. असं कल्याणची लोकं सांगत आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

News Title – Prakash Ambedkar Support To Vishal Patil

महत्त्वाच्या बातम्या

प्रेमानंद महाराज यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

‘…म्हणून नरेंद्र मोदींना एक संधी दिली’; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, बारामतीत नेमकं काय घडलं?

‘2019 पासून राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र?’, ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

पत्नीसह 9 महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या, कारण वाचून उडेल थरकाप